हे सरकार पाण्याचा शत्रू

हे सरकार पाण्याचा शत्रू

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पाणी प्रश्नावरून ठाकरे सरकारला घाम फोडला आहे. सोमवार, २३ मे रोजी भारतीय जनता पार्टी आयोजित जालआक्रोश मोर्चात ते बोलत होते. या मोर्चाच्या निमित्ताने फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. हे सरकार म्हणजे पाण्याचा शत्रू आहे असा घणाघात त्यांनी यावेळी केला.

आजची लढाई ही सत्ता परिवर्तनाची नसून ती व्यवस्था परिवर्तनाची लढाई आहे असे फडणवीस म्हणाले. शिवसेनेच्या नेतृत्त्वातील भ्रष्ट कारभार संपविण्यासाठी आपण रस्त्यावर आलो आहोत असे त्यांनी सांगितले. तर हा केवळ भाजपाचा मोर्चा नाही, तर संभाजीनगरच्या जनतेचा मोर्चा आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभाराचेही चांगलेच वाभाडे काढले. मुख्यमंत्र्यांना कोणत्याच समस्येशी काही लेनदेन नाही. ते म्हणतील, मी म्हणतो म्हणून औरंगाबादला संभाजीनगर समजा, दगडाला सोन्याची नाणी समजा, पाईपला नळ समजा आणि नळातून येणार्‍या हवेला पाणी समजा अशी चपराक फडणवीसांनी लगावली.

हे ही वाचा:

इंग्लंडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपुढे सोनिया गांधीनी पसरला पदर

जपानी मुलाचं हिंदी ऐकून पंतप्रधान मोदी म्हणाले…

मशिदींतून काढलेले भोंगे शाळा, रुग्णालयांना दान

‘१.५, २ रुपये इंधन दर कमी करणे ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा’

आम्ही जेव्हा पाणीपुरवठ्याची योजना मंजूर केली, तेव्हा महापालिकेने १ रुपया द्यावा, बाकी पूर्ण निधी राज्य सरकार देईल असा निर्णय घेतला. आता सरकार बदलले आणि ६०० कोटी महापालिकेला द्यायला सांगितले. आताच्या राज्यकर्त्यांना संभाजीनगरशी काहीच घेणंदेणं नाही. मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ हे महाराष्ट्राच्या नकाशावर आहे, हेच त्यांना ठावूक नाही असा आरोप फडणवीस यांनी केला.

तर वैधानिक विकास मंडळाच्या मुद्द्यावरूनही सरकारला झोडपून काढले. वैधानिक विकास महामंडळाचा मुडदा या सरकारने पाडला. वॉटरग्रीडचा मुडदा पाडला. समुद्रातून वाहून जाणारे पाणी वाचविण्याच्या योजनेला स्थगिती दिली. जलयुक्त शिवार योजना बंद केली. हे सरकार पाण्याची शत्रू आहे असे फडणवीस म्हणाले.

Exit mobile version