“अध्यक्षपदावरुन सरकार घाबरलेलं आहे, हे बघून मला आनंद झाला”- देवेंद्र फडणवीस

“अध्यक्षपदावरुन सरकार घाबरलेलं आहे, हे बघून मला आनंद झाला”- देवेंद्र फडणवीस

“महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्ष बिनविरोध निवडले जाण्याची परंपरा आहे. पण हे सरकार असं आहे की विरोधी पक्षांशी संवाद करत नाही, विरोधी पक्षांच्या अधिकारांचं हनन करतं, त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत आम्ही मित्रपक्षांसोबत बसू आणि निर्णय घेऊ. मात्र विधानसभा अध्यक्षपदावरुन सरकार घाबरलेलं आहे, हे बघून मला आनंद होतोय.” अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी मोदी सरकारकडून घसघशीत मदत देण्यात आलेली आहे.”  असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. “महाराष्ट्रासाठी मान्य झालेल्या आणि अर्थसंकल्पात तरतूद झालेल्या प्रकल्पांचे एकूण मूल्य ३ लाख ५ हजार ६११ कोटी इतकी आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात केंद्राने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, हा आरोप धादांत खोटा आहे.” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंना नाना पटोलेच अध्यक्षपदी का हवेत?

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे १६९ आमदारांच्या जोरावर सत्तेत आले आहे. नाना पटोले यांनी  विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे आता पुन्हा एकदा सरकारला शक्तीपरिक्षण करावे लागणार आहे. यामध्ये आकडा किंचीत कमी झाला,तरी सरकारची नाचक्की होणार आहे. त्यामुळेच नाना पाटोलेंनी राजीनामा दिल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Exit mobile version