महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागातील भरती परीक्षांचा गोंधळ संपता संपत नाहीये. महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या भरतीतील गोंधळानंतर आता म्हाडाच्या भरती परीक्षेत गोंधळ झाला आहे. रविवार, १२ डिसेंबर रोजी होणारी ‘म्हाडा’ ची भरती परीक्षा अचानक पणे पुढे ढकलण्यात आली आहे. शनिवार, ११ डिसेंबर रोजी रात्री उशिरा महाराष्ट्र सरकारचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे.
सरकारच्या या भोंगळ कारभारा विरोधात राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांसोबतच विरोधी पक्षाचे नेतेही या संदर्भात प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा:
‘म्हाडा’ भरती परीक्षेत दलालांचा सुळसुळाट? आव्हाड म्हणतात…
‘म्हाडा’ ची भरती परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींचा संताप
नोकरी देऊ शकत नसाल तर किमान अशी थट्टा तरी करू नका
…म्हणून पंतप्रधान मोदींचे ट्विटर खाते हॅक झाले?
काय म्हणाले पडळकर?
“प्रस्थापितांचे बोलघेवडे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गृहनिर्माण खात्याचा दर आठवड्याला एक्सेल शीटमध्ये न चुकता रिपोर्ट घेतात. पण बहुजन पोरांच्या भविष्याची निगडित असलेल्या या भरती बाबत लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. या मागील आठवड्यापासून ‘म्हाडा’ च्या नोकर भरती परीक्षेमध्ये घोटाळा होणार आहे. त्याला तुम्ही बळी पडू नका असं वारंवार प्रसार माध्यमातून वारंवार आवाहन करत होते. म्हणजे त्यांना याची पूर्व कल्पना होती आणि गृह खाते राष्ट्रवादीकडे असताना सुद्धा त्यांना रात्री दीड वाजता ही परीक्षा का रद्द करावी लागली? यावरून सिद्ध होतं की महाराष्ट्रातील या प्रस्थापितांच्या सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस आहे. एक एक रुपया गोळा करून परीक्षेसाठी पोहोचलेल्या बहुजनांच्या पोरांविषयी, आत्महत्या करणाऱ्या बहुजनांच्या मुलां विषयी त्यांना काहीही देणेघेणे राहिलेले नाही.”