ठाकरे सरकार हेच ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी

ठाकरे सरकार हेच ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी

ठाकरे सरकार हेच महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ठाणे येथे आयोजित ओबीसी जागर परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ‘ठाकरे सरकारचा बुरखा टराटरा फाडला पाहिजे’ असे म्हणत सरकारवर हल्ला चढवला आहे.

बुधवार, २० ऑक्टोबर रोजी ठाणे येथे भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा तर्फे ओबीसी जागर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर केंद्रीय मंत्री भिवंडीचे खासदार कपिल पाटील, भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस संजय कुटे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यासमवेत ठाणे पालघर जिल्ह्यातील भाजपाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणातून फडणवीसांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे.

हे ही वाचा:

मुंबईच्या फुटपाथवरून जप्त केले २१ कोटीचे हेरॉईन आणि महिलेला केले जेरबंद

जरंडेश्वर प्रकरणी सोमैय्यांची ईडीकडे तक्रार

फेसबुकचे नव्याने बारसे होणार

‘महापौरांचा बंगला हडप केल्यावर तरी स्मारक लवकर होईल, अशी आशा होती’

ओबीसी आरक्षण केवळ गेले नाही तर आरक्षण गेल्यामुळे ओबीसी समाजावर मोठा अन्याय झाला आहे. संपूर्ण देशात ओबीसी आरक्षण इतर कुठेही गेले नसून फक्त महाराष्ट्रात गेले आहे. याला सर्वस्वी ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे सांगत सरकारच्या उदासीनतेमुळे ओबीसींचे आरक्षण गेल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. तर ठाकरे सरकार हेच या ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी असल्याचे फडणवीस म्हणाले.

या सरकारची इकोसिस्टीम एका सुरत खोटे बोलते. जनगणनेचा डेटा आणि इंपेरिकल डेटा यांच्या आधारे कायम जनतेचा बुद्धीभेद करायचा प्रयत्न केला जातो. वास्तविक जनगणनेचा डेटा आणि ओबीसी आरक्षणाचा काहीही संबंध नाही. आरक्षण देण्यासाठी केवळ आणि केवळ इंपेरिकल डेटाच हवा आणि तो डेटा मागास वर्ग आयोगाकडून राज्य सरकारच मिळवू शकते असे फडणवीस यांनी सांगितले.

तर भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर यांचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले की हे असे कार्यक्रम राज्यात सर्वत्र जाऊन केले पाहिजेत. ओबीसी समाजामध्ये जाऊन या सरकारचे सत्य मांडणे गरजेचे आहे. ओबीसींचे आरक्षण कशा प्रकारे गेले, कशाप्रकारे ओबीसी समाजावर अन्याय केला जातो या सर्व गोष्टी समाजात जाऊन सांगायला लागतील असे फडणवीस यांनी सांगितले.

Exit mobile version