पैसे देऊन मोर्चात माणसे आणल्याचा आरोप

मोर्चात माविआ ने पैसे देऊन गर्दी जमा केली आहे असा आरोप भाजपने केला आहे.

१७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीने शिंदे फडणवीस सरकारविरुद्ध मोर्चा काढला होता. कालच उद्धव ठाकरे यांनी महामोर्चा सभेमध्ये शिंदे सरकारवर ‘लफंगे’ अशी टीका केली होती. लफंगे कोण हे महाराष्ट्राने बघितले आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. नवीन म्हणजे आता या मोर्चात माविआ ने पैसे देऊन गर्दी जमा केली आहे असा आरोप भाजपने केला आहे.

पैसे वाटून महाविकास आघाडीने मोर्चात लोक आणलेत का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी पैसे वाटपाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. पत्रकार संघटना मुंबईतील काँग्रेस कार्यालयाजवळ मोर्चा काढताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. केशव उपाध्याय यांनी ट्विट केले आहे की, “मुंबईतील पत्रकार संघाच्या जवळ असलेल्या कॅाग्रेस कार्यालयाजवळ आज मोर्चा सुरू असतानाचे दृश्य… आज मविआ मोर्चात थोडीफार लोक जमली ती सुध्दा अशा पध्दतीने….

‘काँग्रेस कार्यालयाबाहेर पैसे का वाटत आहेत, हे जाणून घेतले पाहिजे. समोर आलेल्या लोकांनी पैसे आणले का?’ याचा खुलासा करण्याची मागणी केशव उपाध्याय यांनी काँग्रेसकडे केली आहे. दरम्यान, पोलिसांच्या आकडेवारीनुसार या मोर्चात ६० ते ६५ हजार लोक सहभागी झाल्याची माहिती मिळाली आहे.

केशव उपाध्याय म्हणाले, “मोर्चा सुरू असताना काही लोक काँग्रेसचे गमछे घालून पैसे घेताना दिसत आहेत. त्यांनी पैशाच्या जोरावर ही जनता गोळा केली आहे. जी गर्दी तिथे उपस्थित होती, त्या सर्व लोकांना पैसे देऊन विकत घेतले आहे का?, हा आमचा प्रश्न आहे. याचे उत्तर खुद्द शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी द्यायला हवे. लोकांचा महाविकास आघाडीवरील विश्वास उडाला आहे. त्यामुळेच त्यांनी पैसे वाटून एवढी मोठी गर्दी जमा केली “, उपाध्याय पुढे म्हणाले.

Exit mobile version