‘औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे महाराष्ट्राचे नेते होऊ शकत नाहीत’

‘औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे महाराष्ट्राचे नेते होऊ शकत नाहीत’

एमआयएम महाविकास आघाडी सरकारसोबत युती करण्यासाठी स्वारस्य दाखवत असल्याच्या वृत्तानंतर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. यावर महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी सांगितले की, एमआयएम हा पक्ष भाजपची बी टीम आहे. त्यांची छुपी युती आहे, असे संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार आहे. राज्यात हेच समीकरण राहणार आहे. आमचा पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारावर चालणारा आहे. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे जाऊन गुढगे टेकतात. त्यामुळे हे नेते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत.

एमआयएम आणि भाजपची युती असल्याचं सर्वांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पाहिले आहे. त्यांच्यासोबत युती शक्य नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. एमआयएमसोबत उघड अथवा छुपी युती होणार नाही. ज्यांच्यासोबत त्यांची छुपी युती आहे, ती युती त्यांना लखलाभ ठरो असेही राऊत यांनी म्हटले. राज्यात तीन पक्षांचे सरकार असून त्यात चौथा पक्ष येणार नाही असेही त्यांनी म्हटले.

हे ही वाचा:

“शिवसेनेने ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ यांना स्वीकारले आहे”

योगी आदित्यनाथ या दिवशी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

रशियाने युक्रेनवर सहा क्षेपणास्त्रे डागली

ओमर अब्दुल्ला म्हणाले होते, काश्मिरी पंडितांच्या अत्याचारास मुस्लिम जबाबदार!

औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यात एक बैठक झाली असून या बैठकीत इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत येण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.

Exit mobile version