‘मुसलमानांनी काशीमधील ज्ञानवापी मशिद आणि मथुरेतील शाही ईदगाह यांच्यावरील दावा सोडावा. या जागा त्यांनी हिंदूंसाठी सोडाव्यात. असे केले गेल्यास इस्लामोफोबिया संपुष्टात येईल,’ असे आवाहन आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी केले आहे. तथाकथित धर्मनिरपेक्ष बुद्धिजीवींना हे पटणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
‘जर तुम्ही मथुरेत शाही ईदगाह बनवणे सुरू ठेवत असाल तर तिथे जाण्यास हिंदू स्वाभाविकपणे नाराज होतील. त्यांनी शाही ईदगाह अन्य कुठेतरी नेले पाहिजे. यानंतर कोणी हिंदू मथुरेत जाईल, तो मुस्लिम समुदायाप्रति कृतज्ञतेसह स्वतःच्या घरी परतेल,’ असे सरमा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
मशिदीला जोरजबरदस्तीने हटवले जाऊ शकत नाही. हिंदू आणि मुस्लिमांच्या दरम्यान चर्चेच्या माध्यमातूनच हे शक्य होऊ शकते, यावरही त्यांनी जोर दिला. ‘आता मोदीजी कॉरिडॉर निर्माण करत आहेत. तिथे प्रत्येक जण जातो. जो कोण काशीमध्ये जातो, तो ज्ञानवापी मशिद पाहतो. लोक प्रश्न विचारतात आणि संतापाने परत फिरतात. जर मशिदीला जबरदस्तीने नव्हे तर आपापसांतील चर्चेने दुसरीकडे नेल्यास परिस्थिती वेगळी असेल,’ असेही सरमा यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
निक्की हेली यांची ‘त्यांना संपवून टाका’ या संदेशासह इस्रायली क्षेपणास्त्रावर स्वाक्षरी!
शशी थरूर यांच्या सहायकांना विमानतळावर अटक
तरुण अभिनेत्रीचा मल्याळम चित्रपट दिग्दर्शक ओमर लुलू विरुद्ध बलात्काराचा गुन्हा
अरविंद केजरीवाल यांचे खोटे पुन्हा उघड
‘इस्लामोफोबिया आमच्यापैकी अनेकांसाठी वास्तवात आहे. कारण आपल्या देशातील मुसलमानांमधील काही घटक बहुसंख्य समाजाचा द्वेष करतो. आसाममध्ये मी मुस्लिम समुदायातील एका मोठ्या गटाला हिंदूविरोधी ते हिंदूंसोबत राहणाऱ्या लोकांमध्ये बदलले. आसाममध्ये अनेक ठिकाणी हा बदल झाला आहे.
याच कारणांमुळे लव्ह जिहादच्या घटना कमी झाल्या आहेत. जमीन हडपण्याच्या घटनांमध्येही घट झाली आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.‘मुसलमानांनी समान नागरी कायद्याचा स्वीकार करावा. तसेच, मुस्लिमांनी मथुरेत कृष्ण जन्मभूमीला स्वीकारावे. ज्ञानवापी मंदिराचा स्वीकार करावा. यामुळे गोष्टी बदलतील. यामुळे हिंदूंमधील इस्लामोफोबिया कमी होईल,’ असेही ते म्हणाले.