देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (१५ नोव्हेंबर) राणी कमलपती रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यासाठी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे गेले असताना पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी बुरखा परिधान केलेल्या मुस्लिम महिलांचा मोठा जमाव रस्त्यावर उभा होता.
मुस्लिम महिलांचा मोठा जमाव भोपाळच्या रस्त्यावर जमला होता आणि त्यांनी तिहेरी तलाक रद्द केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
तीन तलाक कानून को खत्म करने के एतिहासिक निर्णय के लिए भोपाल की मुस्लिम समुदाय की महिलाओं ने प्रधानमंत्री श्री @narendramodi जी का अभिनंदन किया। pic.twitter.com/35ho2oWxww
— BJP MadhyaPradesh (@BJP4MP) November 15, 2021
मुस्लिम समाजातील शेकडो महिला पंतप्रधानांना पाठिंबा देण्यासाठी भोपाळमध्ये जमल्या होत्या. काळा बुरखा घातलेल्या महिला पंतप्रधान मोदींचे पोस्टर आणि फलक घेऊन फिरताना दिसल्या ज्यात ‘तिहेरी तलाकच्या विरोधात नवीन कायदा आणून रद्द केल्याबद्दल धन्यवाद, मोदीजी’ असे लिहिले होते.
हे ही वाचा:
पूजा ददलानीला तिसरे समन्स; त्यानंतर काय?
शिवशाहिरांनी ठेवलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श सतत प्रेरणा देतील
रझा अकादमी, अर्जुन खोतकर नितेश राणेंच्या निशाण्यावर
वय इथले संपत नाही; १०४ वर्षांच्या आजीने मिळविले ८९ गुण
पंतप्रधानांच्या ताफ्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. लोक पंतप्रधानांच्या नावाने घोषणाबाजी ककरत होते. तसेच भोपाळच्या रस्त्यांवर राष्ट्रध्वज आणि भारतीय जनता पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते.
तिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत पास झाल्यावर मोदी सरकारने ही प्रथा बंद करत इतिहास रचला होता. भारतातील मुस्लीम महिलांनी याबाबत आनंद व्यक्त केला होता.