26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरराजकारणभाजपाकडे मुस्लिम मतांचा ओढा : सर्वेक्षणातला अंदाज

भाजपाकडे मुस्लिम मतांचा ओढा : सर्वेक्षणातला अंदाज

गुजरातमध्ये मुस्लिमांची भाजपाला साथ

Google News Follow

Related

गुजरातमध्ये सध्या निवडणुकीचा उत्साह सुरू आहे. भाजप, काँग्रेस, आप आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षात स्पर्धा चालू आहेत. या निवडणुकीत आप पक्ष प्रथमच सर्व १८२ जागांवर निवडणूक लढवत आहे. यावेळची निवडणूक अत्यंत रंजक ठरणार असल्याचे मानले जात आहे. मात्र गुजरात राज्याच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार हे मात्र ८ डिसेंबरलाच स्पष्ट होऊ शकणार आहे. ओवेसीं यांच्या पक्षाने गुजरातच्या राजकारणात उडी घेतल्याने ही स्पर्धा अधिक रंजक बनली आहे. तसेच येथे १८२ जागांपैकी ११७ जागांवर १० टक्के मुस्लिमांचे वास्तव्य आहे. दरम्यान, एबीपी न्यूज आणि सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये मुस्लीम बांधवांचे मत कुठे, कुणाला जाणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या सर्वेक्षणात ओवेसीं यांच्या पक्षापेक्षा भाजपला मुस्लिम बांधवानी जास्त मते दिले आहेत असा अंदाज आहे.

विशेष म्हणजे गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्येच लढत होती. जिथे हिंदूंची मते भाजपकडे जायची तर मुस्लिमांची बहुसंख्य मते काँग्रेसकडे. आजवर गुजरातमधील मुस्लिमांची ८० टक्के मते काँग्रेसला मिळत होती. मात्र यावेळी मुस्लिमांचे कोणत्या पक्षाला मत देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, असे ‘आप’ आणि ‘ओवेसी’ यांच्या पक्ष प्रवेशावरून सांगितले जात आहे.

हेही वाचा :

डोंबिवलीतल्या मुलाचे अपहरण करणाऱ्यांत होत्या तीन महिला, सुखरूप सुटका

आंतरराष्ट्रीय विमानतळावर ६१ किलो सोन्याची जप्ती

आयसीसीच्या सर्वोत्तम संघात टीम इंडियाची बाजी

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या शिष्टाईमुळे कुवेतमध्ये अडकलेल्या युवकाची झाली सुटका

‘एबीपी न्यूज’ आणि ‘सी व्होटरच्या’ सर्वेक्षणात ४७ टक्के मुस्लिम काँग्रेसला मतदान करतील असे सांगण्यात आले आहे. यानंतर आप दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ‘आप’ला २५ टक्के मुस्लिमांची मत मिळू शकतात असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. मात्र हा अंदाज कितपत खरा ठरतो. हे मतदान झाल्यावरच कळू शकते. भाजपाबद्दल बोलायचे झाले तर गुजरातमधील मुस्लिम बांधव हे ओवेसींच्या पक्षापेक्षा भगव्या पक्षाला जास्त महत्त्व देत आहेत. ओवेसी यांच्या पक्षाला केवळ ९ टक्के मुस्लिम मतदान करू शकतात, असा अंदाज या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. तर १९ टक्के मुसलमान  हे भाजपला मतदान करू शकतात. तसेच ओवेसीं यांचा पक्ष फक्त तीन डझन जागांवर निवडणूक लढवत आहे. यावरून हे सिद्ध होते की गुजरात मधील मुसलमान हे भाजपला मतदान करतील असे या सर्वेक्षणावरून दिसून येते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा