त्रिपुरामध्ये झालेल्या कथित मुस्लिमविरोधी हल्ल्याविरोधात महाराष्ट्रामध्ये मालेगाव आणि अमरावतीमध्ये मुस्लिम जमावाकडून दगडफेक करण्यात आली आहे. त्रिपुरामधील कथित प्रकाराविरोधात महाराष्ट्रातील मुस्लिम समुदाय का दगडफेक करत आहे? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. या निषेधाबद्दल गेले अनेक दिवस नियोजन सुरु असूनसुद्धा प्रशासन आणि शासनाने काहीच कारवाई का केली नाही? असा सवालही विरोधकांकडून केला जात आहे.
या दगडफेकीत मोठ्या प्रमाणावर वाहनांची तोडफोड आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या घटना सीसीटीव्हीत कैद करण्यात आल्या आहेत. अमरावतीमध्ये २०-२५ दुकानांवर दगडफेक करण्यात आली आहे. त्याचबरोबर मालेगावमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नांदेडमध्येही अशाच संतप्त समुदायाने गाड्या आणि दुकानांना लक्ष्य केले. त्यात एक पोलिस अधिकारीही जखमी झाल्याचे विविध टीव्ही वाहिन्यांवर दाखविण्यात येत आहे.
त्रिपुरा पोलिसांनी फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब अधिकाऱ्यांना बांगलादेशातील अलीकडील जातीय हिंसाचाराच्या घटनांनंतर त्रिपुरातील काही घटनांच्या संदर्भात शंभरहून अधिक खात्यांचा तपशील देण्यास सांगितले आहे. ज्यातून विविध बनावट आणि प्रक्षोभक पोस्ट केल्या गेल्या आहेत. त्रिपुरा पोलिसांनी अनेक फौजदारी खटले दाखल केल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील, कार्यकर्ते आणि धार्मिक प्रचारकांसह ७० हून अधिक लोकांवर कारवाई केल्याच्या काही दिवसांतच हे घडले आहे.
हे ही वाचा:
…तर ब्रह्मोस क्षेपणास्त्र LACवर कसे नेणार?
सलमान खुर्शीद यांना, हिंदुत्वावर बरळल्यानंतर घरचा आहेर
न्यूझीलंडविरुद्ध भारताची टीम घोषित, कोण आहे नवीन कर्णधार?
खासगी चालकांकडून शिवनेरी बस सेवा सुरू; संपात फूट पाडण्याचा प्रयत्न, आंदोलकांचा आरोप
“गेल्या दोन आठवड्यांत राज्यात कोठूनही हल्ला आणि धमकावण्याच्या कोणत्याही ताज्या घटनांची नोंद झाली नसली तरी, सीमावर्ती आणि मिश्र लोकवस्तीच्या राज्यात जातीय सलोखा बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दल सतर्क राहिले आहेत.” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.