स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळांमध्ये सूर्यनमस्कार कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने ‘आझादी का अमृत महोत्सव’ या चालू कार्यक्रमात प्रस्तावित ‘सूर्य नमस्कार’ ला विरोध केला असून, मुस्लिम विद्यार्थ्यांना त्यात सहभागी न होण्यास सांगितले आहे.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस हजरत मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी सांगितले की, भारत हे धर्मनिरपेक्ष, बहु-सांस्कृतिक आणि बहु-धार्मिक राष्ट्र आहे. या तत्त्वांच्या आधारे आपली राज्यघटना लिहिण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही सरकारी शिक्षण संस्थेमध्ये धर्माबाबत शिक्षण द्यायला किंवा कोणत्या एका विशेष समूहाच्या मान्यतेच्या आधारावर कार्यक्रमाचे आयोजन करायला आपली राज्यघटना परवानगी देत नाही.असे त्यांनी नमूद केले.
सूर्य नमस्कार हे असंवैधानिक आहे आणि खोटी देशभक्ती आहे. कारण देशातील ख्रिश्चनांसह अल्पसंख्याक मूर्तीपूजेचे पालन करत नाहीत आणि सूर्याला देव मानत नाहीत. त्यामुळे ते लादणे संविधानाशी सुसंगत नाही आणि सरकारने त्यापासून दूर राहावे आणि धर्मनिरपेक्षता पालन करावे. त्यामुळे आम्हाला हा मुद्दा सरकारसमोर मांडायचा होता आणि आमच्या समस्या मांडायच्या होत्या.असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
लॉकडाऊनसाठी मविआच्या मंत्र्यांनी बांधले गुडघ्याला बाशिंग
गलवानवरून टीका करणारे तोंडावर आपटले; चिनी ध्वज त्यांच्याच भूमीतला
ओएनजीसीची जबाबदारी पहिल्यांदा महिलेकडे
‘दहशतवाद्याच्या नावाने रुग्णवाहिका चालू करणाऱ्याकडून दुसरी काय अपेक्षा?’
३ जानेवारी रोजी, तेलंगणाचे क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री व्ही श्रीनिवास गौड, हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आणि पतंजली फाउंडेशनचे अध्यक्ष आणि योगगुरू स्वामी रामदेव हे सर्व लॉन्चिंगवेळी उपस्थित होते. शाळांना १ जानेवारीपासून सूर्यनमस्कार कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत आणि २६ जानेवारी रोजी या थीमवर संगीताचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.