24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाभाजपाला मतदान केल्यामुळे महिलेला तिहेरी तलाकची धमकी

भाजपाला मतदान केल्यामुळे महिलेला तिहेरी तलाकची धमकी

Google News Follow

Related

नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आपली सत्ता राखली आहे. स्पष्ट बहुमत मिळवत भाजपाने एकहाती सत्ता काबीज केली. पण असे असले तरीही लोकशाही मार्गाने मिळालेल्या या विजयाने अनेकांना मिरची लागली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये अशी एक घटना पुढे आली आहे. बरेली येथे घडलेल्या या घटनेत एका मुसलमान माणसाने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मत दिलेस तर मी तुला घटस्फोट देईन असे त्याने आपल्या बायकोला धमकावले आहे.

नजमा उमला असे या महिलेचे नाव असून तिने आपल्या पातीवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या पतीने आपल्याला मारहाण करून घरातून बाहेर काढले आहे. आपण विधानसभेत भाजपाला मत दिले तर आपल्याला घटस्फोट देण्याची धमकीही दिल्याचे या महिलेने सांगितले आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बाज नकवी यांची बहीण फरकत नकवी यांच्याकडे या महिलेने तक्रार केली आहे.

हे ही वाचा:

तेलंगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध! दगडफेकीनंतर जमावबंदी लागू

… म्हणून इम्रान खान यांनी केलं भारताचं कौतुक

लक्ष सेन स्पर्धा हरला, पण मने जिंकून गेला

‘आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार, मात्र लाभ घेते पवार सरकार’

 

नजमा उलमा हीचा पती आणि मामा समाजवादी पक्षाचा कार्यकर्ते आहेत. २०२१ साली नजमा तिच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन तस्लिम अन्सारी याच्याशी विवाह केला. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यावर नजमा हिने आपण भाजपाला मत दिल्याचे आपल्या पतीला सांगितले. हे कळताच तिचा पती तिच्यावर भडकला. त्याने नजमाला मारहाण केली आणि तिहेरी तलाक देण्याची धमकी दिली.

सध्या या संपूर्ण प्रकरणात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा