मुस्लिम जमातचे रझवी वक्फ विधेयकाच्या पाठीशी

अखिल भारतीय मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांचा विधेयकाला पाठिंबा

मुस्लिम जमातचे रझवी वक्फ विधेयकाच्या पाठीशी

अखिल भारतीय मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी वक्फ (सुधारणा) विधेयकाला पाठिंबा दिला आहे. तसेच यामुळे मुस्लिमांना मोठा फायदा होणार असून त्यांच्या सामाजिक- आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी मुस्लिम समुदायाला आश्वासन दिले आहे की, या कायद्यामुळे मशिदी, दर्गा, ईदगाह किंवा कब्रस्तान यासारख्या मालमत्तांना कोणताही धोका नाही. हे विधेयक हक्क देण्यासाठी आहे, ते हिरावून घेण्यासाठी नाही, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच हे विधेयक मुस्लिमांच्या हिताला हानी पोहचवतील या दाव्याचे खंडन केले आहे.

लोकसभा आणि राज्यसभेत वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर बोलताना रझवी यांनी केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानले. तसेच त्यांनी जनतेचे या निर्णयाबद्दल अभिनंदन केले. “मी मुस्लिम समुदायाला खात्री देऊ इच्छितो की, वक्फ सुधारणा विधेयकाद्वारे कोणताही धोका नाही. मशिदी, दर्गा, ईदगाह किंवा कब्रस्तान यांनाही धोका नाही. खरा धोका वक्फ भूमाफियांना आहे, ज्यांनी कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता लुटल्या आहेत आणि वक्फच्या खऱ्या उद्देशाविरुद्ध काम केले आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

हे ही वाचा : 

काँग्रेस वक्फ सुधारणा विधेयकाला देणार सर्वोच्च न्यायालयात आव्हान

वक्फचे समर्थन करणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला तुडवले, संभलमधील घटना

“वक्फ सुधारणा विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर होणे देशासाठी ऐतिहासिक क्षण”

लोकसभेनंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर

रझवी यांनी मुस्लिम समुदायाला विधेयकाविरुद्ध निषेध करण्यापासून परावृत्त करण्याचे आवाहन केले आहे. तसेच रझवी जनतेला आवाहन केले आहे की, राजकीय चुकीच्या माहितीविरुद्ध जनतेने अफवांनी दिशाभूल होऊ नये. ते म्हणाले की, “मी मुस्लिमांना आवाहन करतो की त्यांनी राजकीय अजेंड्यांनी प्रभावित होऊ नये आणि विधेयकाबद्दल पसरवल्या जाणाऱ्या खोट्या कथनांकडे लक्ष देऊ नये.

ही तर कमाल झाली! नरेंद्र मोदी बँकॉकमध्ये राहुल गांधी भारतात | Mahesh Vichare | Rahul Gandhi |

Exit mobile version