हिजाब घालण्याचा हट्ट करत मुलींच्या ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा

हिजाब घालण्याचा हट्ट करत मुलींच्या ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा

कर्नाटकातील टुमकूर येथील घटना

कर्नाटकात अजूनही हिजाबचा वाद शमलेला नाही. सध्या यासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पण कर्नाटकातील टुमकूर या जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये हिजाब आणि बुरखा घालून आलेल्या मुलींना प्रवेश नाकरण्यात आल्यावर त्यांनी अल्ला हू अकबरच्या घोषणा देत धुडगूस घातला.

टुमकूल येथील कॉलेज बुधवारी उघडले. त्यांनी बुरखा आणि हिजाब घातलेल्या मुलींना प्रवेशास नकार दिला. कर्नाटक उच्च न्यायालयाने जोपर्यंत त्यांच्याकडे सुरू असलेली सुनावणी संपत नाही तोपर्यंत हिजाब न घालताच विद्यार्थ्यांनी कॉलेजात किंवा शाळेत जावे असे म्हटले आहे. मात्र न्यायालयाच्या या आदेशाचे उल्लंघन या मुली करताना दिसत होत्या.

कॉलेज उघडण्याच्या दिवशी पोलिसांनी १४४ कलम लागू करत जमावबंदी केली होती. कॉलेजपासून २०० मीटर अंतरापर्यंत ही जमावबंदी लागू होती. एकूण ९ जिल्ह्यात अशी जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

न्यायालयाच्या आदेशामुळे अनेक शाळा-कॉलेजांनी हिजाब आणि बुरखा घालून येणाऱ्या मुलींना प्रवेश नाकारला. कॉलेजात हिजाब काढण्यास सांगण्यात आल्यानंतर तिथे गोंधळ घालण्यात आला. काही मुलींनी हिजाब घालून कॉलेजात प्रवेश देण्याची मागणी केल्यानंतर हुबळी येथील एसजेएमव्ही कॉलेजने सुट्टी जाहीर केली. मुलींनी बुरखा काढण्याची तयारी दर्शविली पण हिजाब काढणार नाही, असा पवित्रा घातला.

हे ही वाचा:

संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर

संत रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी भजनात रमले

कोरलाईत १८ घरे बांधली, ऑनलाइन करही भरला

राहुल तांगडी यांच्यासह चार सामाजिक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

 

कर्नाटकातील उडुपी येथे काही मुलींनी गेल्या महिन्यात हिजाब घालून कॉलेजात शिरण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला कॉलेज प्रशासनाने विरोध केला. तेव्हा त्या मुलींनी तिथे आंदोलन सुरू केले. या आंदोलनानंतर देशभरात असे आंदोलन सुरू झाले. हिजाब हा आमचा अधिकार आहे, असे पोस्टर्स घेऊन महिलांचे मोर्चे काढण्यात आले. एवढेच नव्हे तर कॉलेज, शाळांमध्ये मुस्लिम मुले नमाझ पढत असल्याचे व्हीडिओदेखील व्हायरल झाले. मुस्कान खान या मुलीने दिलेल्या अल्ला हू अकबरच्या घोषणांमुळे हे वातावरण आणखी तापले. तिला तर एका मुस्लिम संघटनेने ५ लाखांचे इनाम जाहीर केले.

स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना यात कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (सीएफआय) या संघटनेचा हात असल्याचा संशय आहे.

Exit mobile version