पॅलेस्टिन ध्वज फडकविण्याचे आवाहन करणाऱ्याला मौलानाला अटक

पॅलेस्टिन ध्वज फडकविण्याचे आवाहन करणाऱ्याला मौलानाला अटक

आपापल्या घरांवर आणि गाड्यांवर पॅलेस्टिनचे ध्वज लावण्याचे आवाहन करणाऱ्या मौलाना यासिर अख्तर याला उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी अटक केली. शुक्रवारच्या नमाजानंतर अख्तरने हे आवाहन केले. त्याबद्दल त्याला भारतीय दंडविधान ५०५ (२) या कलमाखाली अटक करण्यात आली.

टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार आझमगढचे पोलिस अधीक्षक सुधीर कुमार सिंह यांनी सांगितले की, सरैमिर या भागातील उत्तर चुरिहार कसबा येथे राहणारे यासिर यांनी फेसबुकच्या माध्यमातून लोकांना हे आवाहन केले होते. आझमगढ एक्स्प्रेस या त्यांच्या फेसबुक पेजवर त्यांनी पॅलेस्टिनचा ध्वज शेअर करून असाच ध्वज आपापल्या घरांवर आणि गाड्यांवर लावण्याचे आवाहन शुक्रवारच्या नमाजानंतर त्याने केले होते.

हे ही वाचा:

कोमट पाणी, कुजकट वाणी

वैमानिक दीपक साठे यांची नुकसानभरपाई ठाकरे सरकारने अडवली

देशाला कोविड पाठोपाठ काळ्या बुरशीची चिंता

ठाकरे सरकार एक्सिस बँकेला शरण

पोलिसांनी सांगितले की, सरैमिर पोलिस स्थानकात त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर यासंदर्भात तपास करणाऱ्या पथकाच्या माहितीनुसार त्याला अटक करण्यात आली. पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नुकतीच उत्तर प्रदेश पोलिसांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या एका मौलवीसह चार जणांना कनौज पोलिसांनी अटक केली होती.  त्याशिवाय, सोशल मीडियावरील व्हीडिओच्या आधारे पोलिसांनी आणखी १५ जणांना तसेच आणखी चार जणांनाही ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून या घटनेची तिखट शब्दांत दखल घेतली आहे.

शर्जिल उस्मानीसारख्या भामट्यांचे लाड पुरवायला उत्तर  प्रदेशात मरतुकडे हिरवे ठाकरे सरकार थोडेच आहे? अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारवर आसूड ओढला आहे.

शर्जिल उस्मानीने मध्यंतरी महाराष्ट्रात हिंदूविरोधी गरळ ओकल्यानंतर अजूनही त्याच्याविरुद्ध महाराष्ट्रातील ठाकरे सरकारकडून कारवाई झालेली नाही.

 

 

Exit mobile version