28 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणमुरुगन यांच्या मेहनतीचे झाले चीज

मुरुगन यांच्या मेहनतीचे झाले चीज

Google News Follow

Related

तामिळनाडूमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने दोन दशकांनंतर प्रथमच चार आमदार निवडून आणले. त्याचे बक्षीस म्हणून तामिळनाडूचे भाजपा अध्यक्ष एल. मुरुगन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले आहे.

तामिळनाडूमध्ये केलेल्या या मेहनतीचे चीज झाल्याची भावना मुरुगन यांनी व्यक्त केली आहे.

मुरुगन यांची तामिळनाडू भाजपा अध्यक्ष म्हणून २०२०मध्ये जबाबदारी सोपविण्यात आली तेव्हा त्यांच्याकडे या निवडणुकीच्या तयारीसाठी वर्षभरापेक्षाही कमी वेळ होता. मात्र असे असतानाही त्यांनी समर्थपणे किल्ला लढविला.

हे ही वाचा:

मिरारोड परिसरातून मोठा तस्कर जाळ्यात!

आईची हत्या करून हृदय खाल्ले

अरेरे! पोलिसांनी केलेल्या मारहाणीत दिव्यांगाला गमवावे लागले प्राण

काश्मिरमध्ये २४ तासात पाच दहशतवाद्यांचा खात्मा

तामिळनाडूतील द्रविडी विचारांची पाळेमुळे खोलवर रुजलेली असताना तिथे हिंदुत्वाचे बीजारोपण करणे मुरुगन यांच्यासाठी सोपी गोष्ट खचितच नव्हती. पण त्यांनी आपल्या पूर्वसुरींपेक्षा वेगळी भूमिका घेत द्रविड विचारधारेला स्वीकारले आणि राष्ट्रवादाची भूमिकाही बळकट केली. वीस वर्षांहून अधिक काळ दलित नेते असलेल्या मुरुगन यांनी भाजपात प्रवेश करण्यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही काम केले. संघटनात्मक कौशल्यासाठीही त्यांना ओळखले जाते. मुरुगन हे धारापुरम या मतदारसंघातून निवडणूक लढले पण अवघ्या १३९३ मतांनी ते पराभूत झाले. द्रमुक पक्षासह युती केलेल्या भाजपाने या निवडणुकीत २००१ला चार जागा जिंकल्या होत्या. यावेळीही भाजपाने तीच कामगिरी करून दाखविली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा