केरळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केरळमधील पलक्कड येथे शनिवारी, १६ एप्रिल रोजी दुपारी एक वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्याची एका टोळीने हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यकर्त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
श्रीनिवासन असे आरएसएस कार्यकर्त्याचे नाव आहे. श्रीनिवासन हे आरएसएसचे माजी प्रचारक होते. दुपारी एकच्या दरम्यान श्रीनिवासन हे त्यांच्या दुकानात उभे होते. त्यावेळी दोन दुचाकींवर आलेल्या पाच जणांनी श्रीनिवासन यांच्यावर हल्ला केला. आरएसएसचे माजी प्रचारक श्रीनिवासन यांच्यावर पॉप्युलर फंड ऑफ इंडियाच्या लोकांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ही हत्या राजकीय हेतूने झाल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्याचवेळी श्रीनिवासन यांच्या हत्येमागे एसडीपीआयचा हात असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे.
श्रीनिवासन यांच्यावर तलवारीने हल्ला केला, या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. एक दिवसापूर्वी पलक्कडमध्ये स्थानिक एसडीपीआय नेते सुबैर यांची हत्या करण्यात आली होती.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले १०८ फुटी हनुमान पुतळ्याचे उद्घाटन
एमआयएमचा पदाधिकारी बायकोसोबत करणार हिंदू धर्मात प्रवेश
शरद पवार भाषण करताना व्यक्ती पोहोचला मंचावर
भारतीय जनता पक्षाने आरोप केला की श्रीनिवासन यांच्या हत्येमागे राजकीय शाखा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आहे. एसडीपीआयची स्थापना २१ जून २००९ रोजी नवी दिल्लीत झाली होती. एसडीपीआयही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची राजकीय शाखा आहे. त्याची स्थापना झाल्यानंतर एक वर्षानंतर १३ एप्रिल २०१० रोजी निवडणूक आयोगाकडे नोंदणी करण्यात आली. एम. के. फैजी हे एसडीपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.