राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवार, १० नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पण या आरोपांमुळे नवाब मलिक हेच अडचणीत येण्याचे चित्र निर्माण झाले आहे. नवाब मलिक यांनी ज्यांचे नाव घेत फडणवीसांवर आरोप केले, त्यापैकी मुन्ना यादव यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आपण १ रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. नोटबंदीच्या काळात फडणवीस यांच्या सुरक्षेत १४ कोटी ५६ लाख रुपयांच्या खोट्या नोटांचा कारोबार सुरु होता असा आरोप मलिक यांनी केला आहे. तर हाजी अराफत, हैदर आझम, मुन्ना यादव यांच्यासारख्या गुंडांना फडणवीसांनी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याचे म्हटले होते.
हे ही वाचा:
‘मराठी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल ठाकरे सरकारला आपुलकी नाही’, गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल
नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? हर्षदा रेडकर यांची पोलीस तक्रार
हायड्रोजन बॉम्ब जो फुटलाच नाही
मुन्ना यादव हा नागपूरचा गुंड आहे. पण तो आपल्या राजकीय साथीदार आहे. त्याला फडणविसांनी कन्स्ट्रक्शन बोर्डाचा अध्यक्ष बनवलं होतं की नाही? असा सवाल नवाब मलिक यांनी केला होता. तर तुमच्याकडे गंगेत मुन्ना यादव पवित्र झाला होता की नव्हता? असेही नवाब मलिक यांनी विचारले होते. यावरूनच मुन्ना यादव यांनी नवाब मालिकानावर पलटवार केला आहे.
माझ्यावर कोणत्याही गुंडगिरीचे गुन्हे नोंद नाहीत. जे आहेत ते राजकीय स्वरूपाचे आंदोलनातील गुन्हे आहेत. नवाब मलिक यांनी आपल्यावर बिनबुडाचे खोटे आरोप केले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे मुन्ना यादव यांनी सांगितले आहे. नवाब मलिकांच्या विरोधात एक रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे मुन्ना यादव यांनी सांगितले आहे. यावेळी नवाब मलिक यांची औकात एक रुपयाची असल्यामुळेच त्यांच्यावर एक रुपयाचा दावा दाखल करणार असल्याचे यादव यांनी सांगितले आहे.