राज्य निवडणूक आयोगाचे राज्यातील महापालिकांना पत्र
महापालिका निवडणुकांबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांना पत्राद्वारे महत्वाचे आदेश दिले आहेत. या आदेशावरून महानगर पालिकेच्या निवडणूका लवकरच होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
महापालिका निवडणूक संदर्भात राज्य निवडणुक आयोगाचे महत्वाचे आदेश दिले आहेत. या आदेशात ११ मे पर्यंत अंतिम प्रभाग रचना पूर्ण करावी आणि १२ मे पर्यंत प्रभाग रचना अंतिम प्रस्ताव राज्य निवडणुक आयोगाकडे मान्यता पाठवावी. तसेच १७ मे पर्यंत अंतिम प्रभाग रचना यादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
राज्य निडणूक आयोगाने राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई,वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर,अकोला, सोलापूर, नाशिक , पिपंरी चिंचवड, कल्याण आणि डोंबिवली महापालिकांना पत्र पाठवले आहे.
दरम्यान, महानगरपालिका निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा:
‘ ठाकरे सरकारविरोधात राज यांनीही लढावे’
महसूल गुप्तचर संचालनालयाने हाणून पाडले सोन्याच्या तस्करीचे प्रयत्न
‘आडनावांवरून पालिका कारवाई करते आहे का’?
ममता बॅनर्जीनी दिला स्वतःलाच पुरस्कार
पहिल्या टप्प्यात ज्या महापालिकांना सहा महिने किंवा एक वर्ष झालं आहे त्यांची निवडणुक घेतली जाणार. तर दुसऱ्या टप्प्यात नुकतीच मुदत संपलेल्या महापालिकांची निवडणुक होणार असल्याची शक्यता आहे. एकत्रित निवडणुक आल्याने निवडणुक आयोगावर तसेच शासकीय यंत्रणेवर ताण पडू शकतो त्यामुळे अशी रणनीती आखण्याचं काम सुरु आहे.