मुंबईच्या महापालिका आयुक्तपदी इक्बाल सिंग चहल आहेत. मात्र, त्यांची बदली होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. शिंदे फडणवीस सरकार आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या कामावर नाराज असल्याने त्यांच्या बदलीच्या चर्चा सुरु आहेत.
कोरोना महामारीत मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत होता. त्यावेळी मुंबईच्या आयुक्तपदी इक्बाल सिंग चहल यांची निवड करण्यात आली होती. त्यापूर्वी महापालिका आयुक्तपदी प्रवीण परदेशी हे होते. मात्र, कोरोनाला रोखण्यात परदेशी अपयशी ठरल्याचे कारण देत त्यांची बदली करून, चहल यांची पालिका आयुक्तपदी नियुक्ती केली होती. मात्र, सध्या त्यांच्या कामावर शिंदे फडणवीस सरकार नाराज असल्याने त्यांची बदली होणार आहे.
हे ही वाचा:
यूपी साकारला १८ फुटी ‘स्वर्ण गणेश’
‘आता महामार्गावर टोलनाक्यांऐवजी कॅमेरे बसवले जाणार’
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयांना ईडीकडून अटक
दरम्यान, आयुक्त होण्यापूर्वी इक्बाल सिंग चहल हे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव होते. १९८९ च्या आयएएस बॅचचे होते. वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या या अनुभवामुळे त्यांची मुंबई आयुक्तपदी निवड करण्यात आली होती. इक्बाल सिंग चहल यांनी यापूर्वी अनेक महत्वाच्या खांत्यांमधील पदांवर काम केले आहे. जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवपदीही त्यांनी काम केले आहे. वैद्यकीय आणि औषध विभागाचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. म्हाडाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.