भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांची उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीवर आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या मुलाखतीवर घणाघाती टीका केली आहे.
ते म्हणाले की, आजची मुलाखत कार्यकारी संपादक संजय राऊत, संपादक रश्मी ठाकरे असलेल्या सामनातील एकूणच कौटुंबिक मुलाखत होती. अडचणीचे ठरतील असे प्रश्नच नव्हते. जनतेच्या मनातील प्रतिमा भंजनाच्या दृष्टीने सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न म्हणून मुलाखतीकडे पाहिले पाहिजे. विरोधी पक्ष संवेदनशील आणि सुसंस्कृत असला पाहिजे, असे म्हणता मग आताच्या विरोधी पक्षांनीही सुसंस्कृत असले पाहिजे. पण शब्द काय वापरता इतरांसाठी गद्दार. २४ ऑक्टोबर २०१९ लाही जनता तुमच्याबद्दल हेच म्हणत होती. तुम्ही निवडणुकीत आपल्या वडिलांचे फोटो वापरून निवडून या,असे आवाहन करता. मग नरेंद्र मोदी हे तुमचे वडील नव्हते त्यांचे फोटो वापरून का निवडणूक लढविली.
मुनगंटीवार म्हणाले की, सुडाचे राजकारण नको. मग फ़डणवीसांना नोटीस कुणी लावली? अजामीनपात्र गुन्हा राणेंवर का दाखल केला? नवनीत राणा हनुमान चालिसा वाचणार नाही असे सांगितल्यानंतरही त्यांना जेलमध्ये कुणी टाकले? निवृत्त नौदल अधिकाऱ्याने सोशल मीडियावर कमेन्ट केली तर त्यांचा डोळा फोडला, सावरकरांबद्दल काँग्रेसने अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. त्यावेळी शांत बसलात. कंगना राणावत, अर्णब गोस्वामी किंवा अनेकांविरोधात कायदेबाह्य कारवाई केली. हुकुमशहाचे राजकारण महाराष्ट्रात सुरू होते. पण आज सांगता जनता सार्वभौम आहे? जनता धडा शिकवते हे तुम्हाला आज समजले. राजीनामे द्या आणि निवडणूक लढा म्हणता मग काँग्रेस राष्ट्रवादीचे कमी आमदार असताना तुम्ही का त्यांच्यासोबत गेलात.
हे ही वाचा:
…म्हणून भालाफेकपटू नीरज चोप्राने राष्ट्रकुल स्पर्धेतून घेतली माघार
अदानी-रिलायन्सपैकी कोण जिंकणार 5G स्पेक्ट्रमची बोली
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ही तुमची प्रॉपर्टी नाही ते शिवसैनिकांचे दैवत”
मेट्रो कारशेडच्या कामासाठी फांद्या तोडल्या जात असताना झाडे कापल्याचा कांगावा
याआधी इतक्या वर्षात मुख्यमंत्री मंत्रालयात गेले याची बातमी कधी झाली नाही. पण उद्धव ठाकरे गेल्यानंतर त्याची बातमी झाली. मुलाखत देऊन सहानुभूती घेण्याचा प्रयत्न म्हणजे राजकीय प्लॅन आहे. कौटुंबिक वर्तमानपत्रातून मुलाखती घ्यायच्या हे जनतेला पसंत नाही. महापालिका निवडणुकीत तुम्हाला पराभूत व्हावे लागेल, अशा मुलाखती देऊन. तुम्ही काँग्रेसच्या चुका सांगत नाही, राष्ट्रवादीच्या चुका झाल्या ते सांगत नाही. पण फुटलेल्या आमदारांवर हजारो कोटींचा खर्च झाला असा आरोप करता मग तुम्ही साथ सोडली तेव्हा हजारो कोंटीचा खर्च झाला होता का, असेही मुनगंटीवार म्हणाले.