27 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणआता मुंबईकर मतदार शिवसेनेला धडा शिकवेल

आता मुंबईकर मतदार शिवसेनेला धडा शिकवेल

Google News Follow

Related

मालमत्ता करामध्ये १४ टक्क्याने वाढ होण्याचा प्रस्ताव असताना आता पाणीपट्टी वाढीचाही प्रस्ताव असल्याचे संकेत मिळत आहेत. येत्या वर्षी होणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूक झाल्यावर जनतेला या दोन्ही करांचा बोजा पेलावं लागणार असल्याची चिन्ह आहेत. तूर्तास निवडणूक तोंडावर आल्यामुळे सत्ताधारी पक्ष कोणतीही करवाढ करणार नसल्याचे समजत आहे. या मुद्द्यावर भाजपाने शिवसेनेवर टीकाही केली आहे. भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी या विषयावर ट्विटही केले आहे.

“नालेसफाईच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी रिकामी केल्यानंतर आता वसुलीबाज शिवसेनेने पाणीदरात देखील वाढ करण्याचे ठरवले आहे. येत्या महापालिका निवडणुकीत मुंबईचा मतदार शिवसेनेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.” असं  ट्विट अतुल भातखळकरांनी केलं आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महानगर पालिकेसह राज्यातल्या १० महानगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापत आहे. मुंबईत नालेसफाईची महापालिकेने मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आहे. तरीही पहिल्या पावसानंतरच मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळाली आहे. मोठ्या प्रमाणात निधी खर्च करूनही पाणी साचल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

हे ही वाचा:

कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट

१२ ते १८ वयोगटातील मुलांसाठीही लवकरच लस येणार?

मुंबईत निर्बंध शिथील करा, व्यापाऱ्यांची ठाकरे सरकारकडे मागणी

पुण्यात पुन्हा विकेंड लॉकडाऊन

याशिवाय मुंबईत मालमत्ता कर वाढवण्याचीही माहिती मिळत आहे. सोमवारी या मुद्द्यावर निर्णय घेतला जाईल अशी माहिती मिळत आहे. यापाठोपाठ आता पाणीपट्टीतही वाढ होण्याच्या संकेतानंतर जनतेचा आक्रोश अधिकच वाढला आहे. शिवाय सत्ताधारी सेनेने विरोधकांना टीकेसाठी कारणच दिलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा