मार्चपर्यंत मुंबई होणार खड्डेमुक्त

मार्चपर्यंत मुंबई होणार खड्डेमुक्त

मुंबईसह राज्यात खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. राज्यातील जनता रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्रस्त झाली आहे. याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या जनतेला नवे आश्वासन दिले आहे. मार्चपर्यंत मुंबई खड्डेमुक्त होणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

महाराष्ट्र स्वच्छ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज, ३० सेप्टेंबर रोजी शुभारंभ झाला. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबई महापालिकेतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे झाले पाहिजेत असा आम्ही निर्णय घेतला आहे. तुम्हला मार्चपर्यंत सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे आणि खड्डे मुक्त दिसतील. मुंबईच्या सुशोभीकरणाचा मुद्दाही महत्वाचा असून त्याच्यावर काम सुरू आहे. पुढील ९० दिवसात मुंबईत अनेक बदल दिसतील. छोट्या छोट्या शहरांमध्ये विलक्षण प्रकल्प राबवणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

आज महाराष्ट्र स्वच्छ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता दूतांचे आभार मानले आहेत. स्वच्छता दूत हे खरे या संकल्पनेचे ब्रॅन्ड अम्बॅसिडर आहेत. त्यांनी जर संप पुकारला तर काय होईल? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. खडडे मुक्त रस्त्यांसाठी थोडेथोडे रस्ते न घेता ४५० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी ५५० कोटी मंजूर केलेले आहेत.

हे ही वाचा:

‘संसदभवनावरील सिंह क्रूर दिसत नाहीत, हा तर बघणाऱ्याचा दृष्टिकोन’

काँग्रेसचा अध्यक्ष, अध्यक्ष खेळ सुरूच

नवरात्र २०२२ : कामाख्या मंदिराचे तेजच निराळे

देशात शांतता संविधानामुळे नव्हे, तर हिंदूंमुळे

महाविकास आघाडीवरसुद्धा यावेळी त्यांनी टीका केली आहे. आता सरकार बदलले आहे. रस्ते खड्डेमुक्तीचं काम हे आमच्याकडूनच व्हायचं होतं म्हणून ते राहील वाटतं.कारण हे सोपं काम होतं, ते बहुदा आमच्यासाठी राहिलं होतं. आम्ही चांगले मोठं मोठे कार्यक्रम करतो. अडीच महिन्यांपूर्वी ते केलेले आहेत.आता सर्वच साफ करायचं आहे.

Exit mobile version