मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक रातोरात स्थगित

निडणुकीसाठी ठाकरे गट आणि मनसे निवडणुकीच्या मैदानात होते

मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक रातोरात स्थगित

गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक चर्चेत होती. मात्र, चर्चेची ठरलेली मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक रातोरात स्थगित करण्यात आली आहे. शुक्रवार, १८ ऑगस्ट रोजी या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असताना आदल्या दिवशी रात्री उशिरा यासंदर्भात मु्ंबई विद्यापीठाकडून परिपत्रक जारी करण्यात आले. यानुसार ही निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. ही निवडणूक पुढे कधी होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

मुंबई विद्यापीठातील १० सिनेट सदस्यांसाठी निवडणूक होणार होती. आठवड्यापूर्वी, ९ ऑगस्ट रोजी यासंदर्भात कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यासाठी १८ ऑगस्ट ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. पुढच्या महिन्यात १० सप्टेंबर रोजी मतदान तर १८ सप्टेंबरला निकाल जाहीर होणार होता. जवळपास ९५ हजार तरुण मतदान या निवडणुकीसाठी मतदान करणार होते. पण, गुरुवारी रात्री उशिरा स्थगितीचा निर्णय घेण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

हे ही वाचा:

भारतीय नौदलाची INS विंध्यगिरी सज्ज; राष्ट्रपतींच्या हस्ते जलावतरण

हिमाचलमधील भूस्खलनाला बेबंद बांधकामे कारणीभूत

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी भारतात नव्हे अफगाणिस्तानात; नऊ पत्रकारांना अटक

कोव्हिड जम्बो सेंटर घोटाळा प्रकरणी सुजित पाटकरला अटक

या निडणुकीसाठी ठाकरे गट आणि मनसे निवडणुकीच्या मैदानात होते. या निवडणुका शासनाच्या निर्णयानुसार स्थगित केल्याची बाब मुंबई विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केली आहे. १७ ऑगस्ट २०२३ रोजी राज्य शासनाकडून आलेल्या पत्रातील निर्देशांनुसार ही निवडणूक स्थगित केल्याचं मुंबई विद्यापीठ प्रशासन समितीनं म्हटलं आहे. त्यामुळे पुढील आदेशांपर्यंत निवडणूक स्थगित करण्यात येत असल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे.

Exit mobile version