24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामा... म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस

… म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस

Google News Follow

Related

देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. मुंबई पोलिसांनी १६० कलमांतर्गत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे. चौकशीला हजर राहण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी दिले आहेत.

ही नोटीस फोन टॅप प्रकरणी असल्याची चर्चा होती मात्र या चर्चांना आता देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी ही नोटीस कोणत्या प्रकरणी आहे हे स्पष्ट केले आहे. घोटाळा दाबण्यासाठी सरकारने कसे एफआयआर दाखल केले यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. तसेच या प्रकरणात पोलिसांना सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

हे ही वाचा:

‘द काश्मीर फाईल्सला’ प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद! पहिल्या दिवशीच केली एवढी कमाई

भारत आणि श्रीलंकेची ‘गुलाबी’ कसोटी

राजधानी दिल्लीत अग्नितांडव; सात जणांचा मृत्यू

नोटीस खोट्या गुन्ह्या अंतर्गत असली तरी चौकशीला हजार राहणार

महाविकास आघाडी सरकारमधील गृहविभागातला महाघोटाळा देवेंद्र फडणवीस यांनी मार्च २०२१ मध्ये उघडकीस आणला होता. या प्रकरणा संदर्भातील ट्रान्सस्क्रिप्ट, पेनड्राइव्ह देशाच्या होम सेक्रेटरीला सुपूर्द केली होती. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने यासंदर्भातली सगळी चौकशी सीबीआयला सुपूर्द केली. बदल्यांसंदर्भातील घोट्ळ्याची चौकशी सीबीआय करतेय. अनिल देशमुखांची चौकशी होतेय. मात्र, ज्यावेळी सीबीआयला चौकशी ट्रान्सफर झाली त्यावेळी राज्य सरकारने घोटाळा दाबण्याकरिता एफआयआर दाखल केला. ओफिशियल सिक्रेट ऍक्टमधील माहिती लिक कशी झाली, असा एफआयआर दाखल केला गेला. यासंदर्भात पोलिसांच्यावतीने प्रश्न पाठवण्यात आले. विरोधी पक्षनेता म्हणून माहिती कुठून आली, याचा प्रश्न विचारला जाऊ शकत नाही. तरीही पुन्हा प्रश्नावली पाठवण्यात आली आणि कोर्टात सांगण्यात आले की, देवेंद्र फडणवीस उत्तर देत नाहीत. या संदर्भातच मुंबई पोलिसांनी सीआरपीसी १६० ची नोटीस पाठवली. एफआयआरच्या संदर्भात उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस ठाण्यात त्यांनी बोलवलं असून सहकार्य करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा