भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यासंदर्भात कायदेशीर कारवाया सुरू झाल्या आहेत. मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी आता सोमय्या यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या सीआयएसएफला पत्र लिहिल्याचे समोर आले आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळते.
राणा दांपत्याला अटक झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी गेलेले असताना सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्यात ते जखमीही झाले होते. या हल्ल्यावेळी सीआयएसएफ काय करत होती, असा सवाल आयुक्त पांडे यांनी सीआयएसएफ महासंचालकांना पत्र लिहून केला आहे.
किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी सीआयएसएफ सिक्युरिटी काय करत होती याची चौकशी करा, असे पत्र पोलीस आयुक्तांनी लिहिले आहे. पोलीस आयुक्तांनी सोमय्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने नवा वाद निर्माण होणार आहे.
राणा दांपत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानात येऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर बरेच नाट्य घडले. त्यात दोन दिवस हा सगळा हंगामा सुरू होता. अखेर राणा दांपत्य मातोश्रीवर गेले नाही. पण त्यांना त्यांच्या राहत्या घरातून उचलण्यात आले. आता दोघेही कोठडीत आहेत. त्यावेळी राणा दांपत्याला खार पोलिस स्टेशनमध्ये जाऊन किरीट सोमय्या भेटले होते.
हे ही वाचा:
अजबच!! अजानच्या वेळेला घरात स्पीकर लावल्याबद्दल पोलिसांत तक्रार
एकाच वेळी ७८ हजार २०० तिरंगा फडकवून भारताने केला विश्वविक्रम
अखेर प्रशांत किशोर यांनी काँग्रेस प्रवेशाचा विचार गुंडाळला!
हा विजय एसटी कर्मचाऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा
त्यांना भेटून झाल्यावर ते निघत असताना तेथे रस्त्यावर उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी दगड, चपला किरीट सोमय्यांच्या गाडीवर फेकल्या. त्यात त्यांच्या गाडीची काच फुटली आणि दगडही गाडीच्या सीटवर पडलेला दिसला. या हल्ल्यात किरीट सोमय्या यांच्या हनुवटीला जखम झाल्याचे माध्यमांनी दाखविले. मग त्यावेळी सीआयएसएफने सोमय्या यांची सुरक्षा का केली नाही, असा सवाल पांडे यांनी आपल्या पत्रातून विचारला आहे.