मुंबई लोकल पुन्हा बंद?

मुंबई लोकल पुन्हा बंद?

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल अर्थात गुरुवारी तब्बल ६० हजारांच्या घरात नवे कोरोना रुग्ण आढळले. मुंबईत तर परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. एकट्या मुंबईत रोज १० हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मुंबई तसेच उपनगरीय प्रवास सोपा आणि सोयिस्कर करणाऱ्या लोकलवर पुन्हा निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. तसा विचार राज्य सरकार करत असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

“राज्यात तसेच मुंबईत कोरोना संसर्ग वाढत आहे. सामान्यांचा रोजगार बुडत होता म्हणून मागच्या वर्षी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सध्या लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लोकल पूर्ण बंद करावी किंवा मागच्या वेळेस लोकल सेवेला जे निर्बंध होते ते घालावेत; यावर राज्य सरकारचा विचार सुरु आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.” असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

हे ही वाचा:

सर्वोच्च न्यायालयाकडूनही अनिल देशमुखांना चपराक

मुस्लिम तुष्टीकरणामुळे ममतांना निवडणूक आयोगाकडून नोटीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोविड लसीचा दुसरा डोस

लसींचं राजकारण बंद करा

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसंख्येची घनता जास्त असल्यामुळे येथे रोज हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. काल (७ मार्च) एका दिवसात तब्बल १०,४२८ नवे कोरोना रुग्ण आढळले होते. तर काल दिवसभरात ६००७ जणांनी डिस्चार्ज देण्यात आला. कालच्या आकडेवारीनुसार मुंबईत सध्या ८०८८६ बाधितांवर उपचार सुरु आहेत. आज (गुरुवार) पुन्हा या रुग्णांमध्ये भर पडली असेल. सध्या मुंबईत कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ८० टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा ३५ दिवसांवर आला आहे.

Exit mobile version