अवमान केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई का करू नये?
महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी न्यायालयाला आपण समीर वानखेडे यांच्या विरोधात सोशल मीडियावर काहीही पोस्ट करणार नाही, अशी हमी दिली होती. मात्र, हमी देऊनही नवाब मलिकांची वानखेडेंवर टीका टिप्पणी सुरूच आहे. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना फटकारले आहे. कोर्टाचा अवमान केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई का करू नये? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांना विचारला असून शुक्रवारपर्यंत नवाब मलिकांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत नवाब मलिक हे सातत्याने वेगवेगळे आरोप सोशल मीडियावर आणि पत्रकार परिषदा घेऊन करत असतात. त्यांना लगाम घालावा अशी मागणी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात केली होती. त्यानंतर आपण सोशल मीडियावर काहीही पोस्ट करणार नाही, अशी हमी नवाब मलिक यांच्या वकिलांनी न्यायालयात दिली होती.
हे ही वाचा:
केरळमध्ये ‘मैं बाबरी हूँ’ बिल्ले वाटून मुलांमध्ये पसरवत आहेत द्वेष
‘डॉक्टर आणि परिचारिकांना सौजन्याने वागण्याचे, ध्यानधारणेचे प्रशिक्षण द्या’
‘जेएनयू’त ‘फिर बनाओ बाबरी’ची उबळ
कोस्टल रोड प्रकल्पाच्या सल्लागाराचीच होतेय कमाई
नवाब मलिक हे न्यायालयाच्या आदेशानंतरही टीका करत असून न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल न्यायालयाने मलिक यांना फटकारले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांना विचारला असून शुक्रवारपर्यंत नवाब मलिकांना यासंबंधीचे उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मलिक हे सातत्याने वानखेडे कुटुंबियांवर आरोप करत आले आहेत. कधी ज्ञानदेव वानखेडे यांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचा आरोप, तर कधी समीर वानखेडे यांचे लग्न मुस्लिम पद्धतीने झाल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यामुळे शेवटी ज्ञानदेव वानखेडे यांनी त्यांच्याविरोधात सव्वा कोटींचा दावा दाखल केला होता आणि त्यानंतर मलिक यांच्यावर न्यायालयाने लगाम घातला होता.