राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कथित खंडणी प्रकरणात आता माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेने अर्ज दाखल केला होता. हा अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयाने स्वीकारला आहे.
सीबीआयच्या विशेष न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे हजर करण्यात आले होते. यावेळी सचिन वाझेला माफीचा साक्षीदार म्हणून घोषित करण्यात आले आहे. ७ जूनच्या सुनावणीत वाझेला प्रत्यक्ष कोर्टापुढे हजर करण्याचे निर्देश देण्यात आले असून सचिन वाझे याचा नियमित जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
हे ही वाचा:
१० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी
‘या’ सिलिंडरच्या दरात मोठी कपात
राहुल गांधी आणि सोनिया गांधींना ईडीचे समन्स
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना ‘लता मंगेशकर पुरस्कार’
कथित खंडणी प्रकरणात अनिल देशमुख यांच्यासह इतर आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या लोकांबद्दलची माहिती देण्याची तयारी सचिन वाझेने दाखवली आहे. यासाठी आपल्याला माफीचा साक्षीदार करावं असं त्याने न्यायालयात सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे. सचिन वाझेच्या अर्जाला विशेष सीबीआय न्यायालयाने काही अटी- शर्तींसह मंजुरी दिली आहे.