मुंबईत एकीकडे आल्या दिवशी कोरोना रुग्णसंख्यावाढीचा विस्फोट होत आहे. अशातच जास्तीत जास्त नागरिक लसीकरण करून घेण्याच्या तयारीत आहेत. अनेक नागरिकांचा लसीचा दुसरा डोस घेण्याची वेळ आली आहे. पण अशा परिस्थितीत मुंबईतील रुग्णालयातून मात्र लॉकडाऊन असेपर्यंत लसीकरण बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीकडून या संबंधी थेट मुख्यमंत्र्यांना सवाल विचारला आहे.
महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे थैमान सुरु आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार हे कोरोनाची परिस्थिती हाताळमन्यात सपशेल अपयशी ठरले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील जनता लसीकरणासाठी आग्रही आहे. त्यात १ मे पासून केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सगळेच नागरिक हे कोरोना लस घ्यायला पात्र असतील असे सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील लसीची मागणी आणखीनच वाढणार आहे. पण अशात मुंबईत मात्र लॉकडाऊन असेपर्यंत लसीकरण बंद असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे. मुंबई भाजपाच्या ट्विटर हॅण्डलवरून हे धक्कादायक ट्विट करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
रेमडेसिवीरचा महाराष्ट्राला सर्वाधिक कोटा, पण ठाकरे सरकारचे रडगाणे सुरूच!
लस निर्यातीवरून प्रियांकांचे किळसवाणे राजकारण
वेदांत समुहाकडून प्राणवायूसाठी दक्षिणेतील काही भागांत मदत
गुरुवार, २२ एप्रिल रोजी मुंबई भाजपाच्या ट्विटर खात्यावरून एक ध्वनिफीत पोस्ट करण्यात आली आहे. या ध्वनिफीतत मुंबईतील एक सामान्य नागरिक आणि हॉस्पिटल यांच्यातले फोनवरचे संभाषण आहे. या १६ सेकंदांच्या ध्वनिफीतत जेव्हा लसीकरणाविषयी हॉस्पिटलला विचारणार येते तेव्हा हॉस्पिटलकडून सांगण्यात येते की लॉकडाऊन असेपर्यंत लस उपलब्ध नाहीये. ह्यावरूनच मुंबई भाजपाने थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य करत या प्रकाराचे स्पष्टीकरण विचारले आहे.