सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपाचे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल

सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपाचे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल

राज्यात सध्या भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि शिवसेना यांच्यात राजकीय युद्ध रंगल्याचे चित्र आहे. राज्यातला राजकीय मुद्दा आता दिल्लीत पोहोचला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या, आमदार सुनील राणे, आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, नेते पराग शाह, भाजपा महापालिका नेते विनोद मिश्रा हे आज आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेणार आहेत.

शनिवार, २३ एप्रिल रोजी रात्री शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर भाजपचे शिष्टमंडळ आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेणार आहे. किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत गेलेलं हे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार का याकडेही लक्ष लागून आहे.

किरीट सोमय्या यांनी याबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांचा माफिया म्हणून उपयोग सुरु केला आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेत्यांवर पोलिस ठाण्याच्या आवारात हल्ला केला जातो. या सर्वांची चौकशी केली जावी अशी आमची मागणी आहे,” असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

हे ही वाचा:

कर्नाटकमध्ये दोन दलित तरुणांची हत्या

लाकडांमध्ये लपवले होते ७०० कोटींचे हेरॉईन

‘राणा दाम्पत्यांची केसच बोगस’

गुवाहाटी महापालिका निवडणुकीत भाजपाने ६० पैकी ५८ जागा जिंकल्या

किरीट सोमय्या यांनी रविवार, २४ एप्रिल रोजी उद्धव ठकारे यांच्यावर टीकास्त्र डागले होते. “खार रोड पोलीस ठाणे येथे जो माझ्यावर हल्ला झाला, तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर्ड केलेला हल्ला होता. किरीट सोमय्याचा मनसुख हिरेन करायचा असे नियोजन संजय पांडे आणि उद्धव ठाकरेंनी केले आहे,” असा दावा त्यांनी केला.असल्याचा खळबळजनक दावाही किरीट सोमय्यांनी केला होता.

Exit mobile version