मंगल प्रभात लोढांच्या उपस्थितीत मालवणीत झाली रंगांची उधळण

मंगल प्रभात लोढांच्या उपस्थितीत मालवणीत झाली रंगांची उधळण

महाराष्ट्र सरकारच्या हिंदू विरोधी फतव्याला केराची टोपली दाखवत नागरिकांनी रविवारी उत्साहात होळी साजरी केली, तर सोमवारी रंगपंचमीलाही हाच उत्साह राज्यभर पाहयला मिळाला. सर्वसामान्य माणसापासून ते अभिनेते, नेत्यांपर्यंत सगळ्यांनी या सणाच्या शुभेच्छा देत आपापल्या पद्धतीने हा सण साजरा केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी मलावणीतल्या हिंदू, दलित कुटूंबांसोबत रंगपंचमी साजरी केली. सोमवारी सकाळी आमदार लोढा हे रंग खेळण्यासाठी मालवणीत दाखल झाले. लोढांचे असे अचानक रंग खेळायला येणे हा तेथील स्थानिक नागरिकांसाठीही सुखद धक्काच होता.

मुंबईतल्या मालवणीत परिसरात राहणाऱ्या हिंदू, दलित बांधवांसाठी यावर्षीचा सण खूपच विशेष ठरला. कारणही तसेच होते. सोमवारी सकाळी भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा हे रंगांचा उत्सव साजरा करण्यासाठी मालवणीत जाऊन पोहोचले. मालवणीतील मुस्लिम अत्याचाराने त्रासलेल्या पण त्यांच्या विरोधात आवाज उचलणाऱ्या हिंदू , दलित कुटूंबांसोबत लोढा यांनी रंगपंचमी साजरी केली. आमदार मंगलप्रभात लोढा यांनी यासंबंधीचे फोटो ट्विट केले आहेत. या फोटोत मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, ब्रिजेश सिंह आणि इतर भाजपाचे कार्यकर्ते मालवणीतील हिंदू, दलित बांधवांना रंग लावत त्यांच्यासोबत रंगांचा हा सण साजरा करताना दिसत आहेत. आपल्या अधिकारांसाठी लढणाऱ्या आणि उभ्या राहिलेल्या हिंदू-दलित बांधवांसोबत होळीचा सण साजरा कल्याचे लोढा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

भाजपा सर्वच्या सर्व तीस जागा जिंकेल

भाजपा-राष्ट्रवादी एकत्र येणार का? काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

भारतीय लष्कर आणि पोलिस दलाला कुपवाडा जिल्ह्यात मोठे यश

मुंबईच्या मालवणी भागात तिथल्या बहुसंख्य मुस्लिम नागरिकांकडून अल्पसंख्यांक हिंदू, दलित बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना जानेवारीत समोर आल्या होत्या. आमदार मंगल प्रभात लोढा आणि ‘न्यूज डंका’ ने पहिल्यापासूनच या हिंदूंच्या न्याय हक्कांसाठी मालवणी विषयाचा पाठपुरावा केला आहे. आमदार मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेतही या विषयाला वाचा फोडली होती.

Exit mobile version