भारत आणि मालदीव दरम्यान तणाव वाढला असतानाच, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू यांना मोठा धक्का बसला आहे. भारत समर्थक विरोधी पक्ष मालदिवियन डेमोक्रेटिक पार्टीने राजधानी मालेच्या महापौर निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. या पक्षाचे उमेदवार एडम अजीम यांना मालेचा नवा महापौर म्हणून निवडण्यात आले आहे. हे पद आतापर्यंत मुईझ्झू यांच्याकडे होते. मात्र, मुईझ्झू यांनी गेल्या वर्षी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी या पदाचा राजीनामा दिला होता.
४१ पेट्यांच्या मतमोजणीनंतर विरोधी पक्ष एमडीपीचे नेते एडम अजीम यांनी पाच हजार ३०३ मतांनी मोठा विजय मिळवून दिला आहे. तर, मुइज्जू यांच्या पीपुल्स नॅशनल काँग्रेस (पीएनसी)चे नेता ऐशथ अजीमा शकूर यांना केवळ तीन हजार ३०१ मते मिळाली आहेत. एमडीपीचे नेतृत्व भारत समर्थक मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद सोलिह करतात. त्यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चीनसमर्थक मुईझ्झू यांच्याकडून पराभव झाला होता. महापौर निवडणूक जिंकल्यानंतर एमडीपीला जणू संजीवनी मिळाली आहे.
हे ही वाचा:
घरची माणसं टिकेनात; चालले ‘भारत जोडो’ला!
आज मणिपूरपासून सुरू होणार काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा
५५ वर्षांचे संबंध संपवत मिलिंद देवरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
चीनपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध
चीन दौऱ्यावरून परतल्यानंतर धक्का
चीनच्या पाच दिवसांच्या यात्रेवरून मुइज्जू हे शनिवारी माले येथे परतले. त्यांनी मालदीवला परतल्यानंतर लगेचच आम्ही एक छोटा देश असलो तरी, आम्हाला डिवचण्याचा परवाना कोणाला दिलेला नाही, असे विधान केले होते. मुईझ्झू यांनी हे विधान करताना कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांनी भारताला लक्ष्य केले होते, असे मानले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या किनाऱ्यावरची छायाचित्रे प्रसिद्ध केल्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी मोदी यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्ये केली होती. त्यावरून बॉयकॉट मालदीव असा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेन्ड झाला होता.