एमएसआरटीसीने रोखल्या कर्नाटकात जाणाऱ्या बसेस

एमएसआरटीसीने रोखल्या कर्नाटकात जाणाऱ्या बसेस

कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावाद चिघळत चालला आहे . कर्नाटकमध्ये बसेसवर हल्ला होण्याची भीती असल्याने पोलिसांनी बुधवारी अलर्ट जारी केला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) कर्नाटक राज्यात जाणारी बससेवा बंद केली आहे.

कर्नाटकमध्ये बसेसवर हल्ला होण्याची भीती असल्याने पोलिसांनी बुधवारी अलर्ट जारी केला. यानंतर एमएसआरटीसीने कर्नाटकला जाणाऱ्या त्यांच्या बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला. सीमावादाच्या प्रश्नावरून बुधवारी कर्नाटकातील बेळगावी येथे उग्र निदर्शने झाली. यादरम्यान महाराष्ट्रातील बस आणि ट्रकवर दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत.

महाराष्ट्र पोलिसांनी जारी केलेल्या अलर्टमध्ये दोन राज्यांमधील सीमावादावरून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान बसेसवर हल्ले केले जाऊ शकतात, असे म्हटले आहे. एमएसआरटीसीने सांगितले की, या अलर्टच्या आधारे पुढील आदेशानुसार कर्नाटकला जाणार्‍या बस सेवा थांबवण्यात आली आहे. बसेस आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर सेवा पूर्ववत केली जाईल.

यापूर्वी बेळगावी येथे ट्रक आणि बसेसवर झालेल्या दगडफेकीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले होते. आपण कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी बोललो असल्याचेही फडणवीस म्हणाले होते. दोन्ही राज्यातील जनतेने शांतता राखावी आणि कायदा व सुव्यवस्था स्वत:च्या हातात घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ओळखला जातो. राज्यातील जनतेला सीमावर्ती भागात शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.

हे ही वाचा:

बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांवर केला हल्ला

‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’

पाकिस्तानशी चर्चा नाहीच, भारताची भूमिका

एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मंगळवारी फोनवर चर्चा केली. शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखली पाहिजे यावर दोन्ही मुख्यमंत्र्यांचे एकमत झाले . महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

Exit mobile version