महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक  

महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक  

टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. म्हाडा पेपर फुटी प्रकरणातील अटक आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांच्या घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षेचा घोटाळा शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. त्यानंतर सुपे यांना अटक करण्यात आली आहे.

म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जी.ए. टेक्नॉलॉजी कंपनीचे प्रमुख प्रीतीश देशमुख याच्या पिंपरी- चिंचवडमधील घरातून पुणे सायबर पोलिसांना शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेची कागदपत्रे सापडली होती. त्यामुळे टीईटीच्या परीक्षेतही घोटाळा झाल्याच्या संशयावरून पोलिसांनी तुकाराम सुपे यांची कालपासून चौकशी केली आणि त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

‘या’ तारखेपासून होणार दहावी- बारावीच्या परीक्षा

शरद पवार वाचणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नैसर्गिक शेतीकडे वळण्याची हीच वेळ!

पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली ट्विटरवर ठरले सर्वाधिक लोकप्रिय!

आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड प्रवर्गाच्या भरतीप्रक्रियेत मोठा गोंधळ झाल्याचे समोर आले. आरोग्य विभागाच्या भरतीत विभागातील अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. तर, म्हाडा परीक्षेचे आयोजन करण्याची जबाबदारी असलेल्या सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुखला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता थेट टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराच्या संशयावरुन महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version