एमपीएससीचे विद्यार्थी ठाकरे सरकारविरोधात आक्रमक

एमपीएससीचे विद्यार्थी ठाकरे सरकारविरोधात आक्रमक

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा आणि त्यासंदर्भातील ठाकरे सरकारची भूमिका यामुळे आज अनेक तरुणांचे भविष्य पणाला लागले आहे.  स्वप्निल लोणकर या तरूणाने केलेली आत्महत्या यामुळे अवघा महाराष्ट्र हेलावला. हाता तोंडाशी आलेला मुलगा ऐन तारूण्यात नैराश्येपोटी आत्महत्या करतो हे पाहून पालकही हेलावले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले.

पुण्यातील या घटनेनंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसोबतच एमपीएससीची परिक्षा देणारे विद्यार्थी सुद्धा सरकारविरोधात आक्रमक झाले. शहरातील महात्मा फुले चौकात सरकारचा निषेध करत त्यांनी आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली. परंतु इथेही यांचे म्हणणे ऐकायला कुणालाही वेळ नव्हता. पुण्यानंतर औरंगाबादमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले. सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यास इथेही सुरुवात झाली. सरकारच्या एकूणच शिक्षणाच्या विषयीच्या धोरणावर महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी असंतोषाचे वातावरण आहे.

हे ही वाचा:

भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा!

तुमच्या ‘बां’चं नाही, आमच्या ‘दिबां’चं नाव हवं

ठाकरे सरकारचा रडीचा डाव…१२ भाजपा आमदारांचे निलंबन

वारीला बंदी म्हणजे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचे पाप

राज्यामध्ये आज एमपीएससी परिक्षेबाबत सुरू असलेला गोंधळ बंद करावा, याकरता अनेक शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले. तात्काळ नियुक्त्यांची मागणीही यावेळी करण्यात आली. परंतु ठाकरे सरकार मात्र स्वतःचे अपयश लपवण्यातच व्यस्त आहे. सरकारविरोधात बोलण्यासाठी आज विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थी वर्गाला नियम दाखवून ठाकरे सरकारच्या पोलिसांना आंदोलन आज दडपले. परंतु सरकारने असेच दुर्लक्ष सुरू ठेवले तर मात्र हा वणवा अधिक पेटणार यात वाद नाही.

Exit mobile version