महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने आज राज्य सेवा पूर्व परीक्षेचं आयोजन केले होते. ३९० पदांसाठी २०२१ च्या जाहीरातीनुसार तीसहून अधिक केंद्रावर ही परीक्षा पार पडली. यातील नागपुर केंद्रावर पेपरफुटीचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केंद्राबाहेर आंदोलनाचा ठिय्या मांडला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या पेपरफुटीप्रकरणी आंदोलन केले तेव्हा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी माहिती मिळताच नागपूरच्या परीक्षा केंद्राबाहेर विध्यार्थ्यांसोबत आंदोलन सुरु केले आहे. आज ही एमपीएससीची पूर्व परीक्षा राज्यातील एकूण ३६ जिल्हा केंद्रावर होती. राज्यात एकूण २ लाख २२ हजार ३९५ विध्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंद केली होती.
रजत चोपडे या उमेदवाराने टीव्ही ९ ला दिलेल्या माहितीनुसार, पेपर सुरु होण्यापूर्वी एक तास आधी पर्यवेक्षक पेपर बाहेर घेऊन जाताना दिसले. त्यावर विचारले असता पर्यवेक्षकाने माफी मागितली आणि निघून गेला. मात्र एक तास आधी पेपर घेऊन जायचे कारण काय असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे. रजतला हा प्रकार लक्षात येताच त्याने वर्गाबाहेर येऊन त्वरित अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेशी संपर्क साधला आणि झालेला प्रकार सांगितला.
हे ही वाचा:
ओमायक्रोनच्या धास्तीने ‘या’ पंतप्रधानांनी त्यांचच लग्न केलं रद्द
…अमिताभने लेस बांधताना दिली मुलाखतीची अपॉइंटमेंट
अक्कल’शून्य’ कारभारामुळे जमा झाले ३ कोटीऐवजी ३२ कोटी
प्रजासत्ताक दिनी यासाठी वाजणार ‘सारे जहा से अच्छा’
विद्यार्थ्यांनी पेपरफुटीचा आरोप केला असून, त्याची चौकशी सुरु आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर आमचा पूर्ण विश्वास आहे. परंतु, आयोगाच्या मागे जे चालले आहे त्यामध्ये आयोगाने लक्ष घालावे. आणि अश्या प्रकारमुळेच स्वप्नील लोणकर सारखे उमेदवार हतबल होऊन आत्महत्या करत आहेत. असेही रजत म्हणाला.
ही पूर्व परीक्षा २०२१ च्या जाहिरातीनुसार २ जानेवारीला घेण्यात येणार होती. मात्र अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने परीक्षा पुढे ढकलून २३ जानेवारीला आयोजित करण्यात आली होती.