ठाकरे सरकार विरोधात राज्यातले विद्यार्थी रस्त्यावर

ठाकरे सरकार विरोधात राज्यातले विद्यार्थी रस्त्यावर

ठाकरे सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत राज्य लोकसेवा आोयगाच्या (एमपीएससी) परिक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी ठाकरे सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. ‘एमपीएससीची परीक्षा झालीच पाहिजे’ या मागणीसाठी पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, कोल्हापूर अशा महाराष्ट्राच्या विविध शहरातले विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

हे ही वाचा:

भाजपा नेते रुग्णालयात ममतांच्या भेटीला

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या गेल्या काही काळापासून वाढायला लागली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षा पुढे ढकलल्या आहेत. ही परिक्षा ठाकरे सरकारच्या काळात वारंवार पुढे ढकलण्यात आली आहे. या परिक्षा १५ मार्च रोजी होणार होत्या मात्र महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाने आज परिपत्रक काढून परिक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. शासनाच्या निर्णयाविरोधात पुण्यातील अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्यासोबत भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील पुणे येथे विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सामिल झाले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर आणि आंदोलक विद्यार्थी यांनी परिक्षा झालीच पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. युपीएससीच्या परिक्षा होऊ शकतात, तर एमपीएससी का होणार नाही? असा सवाल देखील विद्यार्थ्यांनी सरकारला केला आहे.

याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीट करून याचा निषेध व्यक्त केला आहे.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी देखील शासनाच्या या निर्णयाचा निषेध करत सरकारला घरचा आहेर दिला आहे. ऐनवेळी परिक्षेला स्थगिती देण्याच निर्णय चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अनेक विद्यार्थी घरदार सोडून अभ्यास करत आहेत.

विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांकडून काही ठिकाणी सौम्य लाठीमार देखील करण्यात आला. मात्र त्यामुळे आंदोलन चिघळले आहेत. त्याशिवाय पोलिसांची अधिक कुमक देखील मागवण्यात आली आहे.

Exit mobile version