तीन राज्यांमधील खासदार खासदारकी सोडणार?

तीन राज्यांमधील खासदार खासदारकी सोडणार?

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुका जिंकणाऱ्या भाजप खासदारांना आता राज्यांतील राजकारणाची सूत्रे सोपवली जाणार आहेत. तिन्ही राज्यांमध्ये भाजपची सरकारे स्थापन होणार असून त्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असेल. अशा परिस्थितीत त्यांच्या जागी संसदेत नव्या चेहऱ्यांना स्थान देऊन त्यांना केंद्रीय राजकारणात स्थान दिले जाईल. तिन्ही राज्यांमधून भाजपच्या जवळपास १२ खासदारांनी विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत.
यामध्ये एक राज्यसभा तर अन्य लोकसभेचे खासदार आहेत.

मध्य प्रदेशमध्ये केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल यांच्यासह उदयराव प्रताप सिंह, रीती पाठक व राकेश सिंह या खासदारांनी विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते, खासदार गणेशसिंह पराभूत झाले आहेत. राजस्थानमध्ये खासदार राज्यवर्धनसिंह राठोड, दीया कुमारी, बाबा बालकनाथ व किरोडीमल मीणा आमदार म्हणून निवडून आले आहेत. भागीरथ चौधरी, देवजी पटेल व नरेंद्रकुमार खीचड पराभूत झाले आहेत. छत्तीसगढमध्ये चार खासदारांपैकी केंद्रीय मंत्री रेणुका सिंह, गोमती साय व अरुण साव निवडणुका जिंकले आहेत. तर, विजय बघेल यांना पराभवाचा सामना करावा लागला. अरुण साव प्रदेशाध्यक्षही आहेत.

हे ही वाचा:

ललित पाटील प्रकरणी येरवडा कारागृहाच्या चीफ मेडिकल ऑफिसरला अटक

नौदल अधिकाऱ्यांच्या सन्मानचिन्हांत आता शिवाजी महाराजांचे प्रतिबिंब

‘मिचॉंग’ने चेन्नईला झोडपलं; ३३ विमाने बंगळूरूकडे वळवली तर १४४ रेल्वे गाड्या रद्द

केसीआर यांना तेलंगणात मात देणारे रेवंत रेड्डी कोण आहेत?

भाजपच्या नेतृत्वाने विधानसभा निवडणुकीत जेव्हा खासदारांना उतरवले होते, तेव्हा त्यांना राज्याच्या राजकारणात आणण्याचा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला मजबूत करण्याचा हेतू होता. आता मतदारांनीही त्यांना निवडले आहे. त्यामुळे आता संसदेच्या ऐवजी त्यांना विधानसभेत ठेवणेच योग्य असेल, असे भाजपच्या पक्षनेतृत्वाचे मत असल्याचे समजते.

Exit mobile version