राज्यात गाजत असलेल्या अंबानीच्या घरासमोरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्युच्या प्रकरण आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीच्या टार्गेटचा केलेला आरोप याचे पडसाद देश पातळीवर सुद्धा उमटले. आज लोकसभेत भाजपा आणि शिवसेनेच्या खासदारांत शाब्दिक चकमक पहायला मिळाली.
आज लोकसभेत बोलताना महाराष्ट्रातील गृहमंत्र्यांवर झालेल्या आरोपावरून चकमक झडलेली पहायला मिळाली. त्याबरोबरच सचिन वाझे याच्यावरून देखील काही खासदारांनी संताप व्यक्त केला.
हे ही वाचा:
राज्याने दरोडे घातले तर तपास केंद्र सरकारलाच करावा लागेल
राज्यात सुरू असलेल्या खंडणीखोरीच्या राजकारणातून वेळ मिळाला तर ही कामे होतील
अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करा
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी देखील आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, कशाच्या आधारावर १६ वर्षे निलंबीत केलेल्या आणि तुरूंगात टाकलेल्या अधिकाऱ्याला पुन्हा एकदा सेवेत घेतले? जेव्हा शिवसेना- भाजपा युतीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना फोन करून त्यांना परत सेवेत घेण्यासाठी सुचवले होते. तेव्हा फडणवीसांनी नकार दिलेला. परंतु जेव्हा ठाकरे सरकार सत्तेत आले तेव्हा सचिन वाझे याला सेवेत परत घेतले. असा घणाघाती आघात नवनीत राणा यांनी शिवसेनेवर केला.
यावेळी सदनात महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था या विषयावरील देखील चर्चा झाली. यावेळी राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली असल्याने राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी देखील काही सदस्यांनी यावेळी सदनात केली.