मणिपूरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदास कोंथौजाम यांनी राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या ८ आमदारांनी राजीनामाही दिला आहे. हे आमदार भाजपामध्ये सामील होणार असल्याचीही माहिती मिळत आहे. मणिपूरमध्ये २०२२ साली मार्च महिन्यात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी काँग्रेसला लागलेली ही गळती काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरू शकते. स्वतः प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसला नामुष्की पत्करावी लागली आहे.
कोंथौजाम हे सहा वेळा निवडून आलेले आमदार आहेत.त्याचबरोबर ते मणिपूर विधानसभेत काँग्रेसचे प्रतोद देखील होते. मणिपूरमध्ये काँग्रेसची सत्ता असताना कोंथौजाम हे मंत्रीही होते. गेल्याच वर्षी डिसेंबरमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोंथौजाम यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमले होते.
काँग्रेस पक्षाने २०२२ च्या निवडणुकीत ६० पैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. परंतु प्रदेशाध्यक्षांनीच राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसच्या सगळ्यात नियोजनावर पाणी फिरलं आहे.
काँग्रेस पक्षाला २०१७ साली झालेल्या निवडणुकांमध्ये बहुमतापेक्षा केवळ ३ जागा कमी होत्या तर भाजपा ९ जागांनी बहुमतापासून दूर होता. परंतु काँग्रेसने पाठवलेले केंद्रीय नेते मित्रपक्ष शोधण्यासाठी कुचराई केल्यामुळे काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नाही आणि भाजपा मित्रपक्षांचं समर्थन घेऊन सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरला.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे
३४ जणांचा जीव जाऊनही महानगरपालिका २ वर्षांपासून सुस्त
मुलगा केंद्रीय मंत्री; पण आईवडील शेतात समाधानी
अश्लिल चित्रपटनिर्मितीप्रकरणी राज कुंद्रा अटकेत
यानंतर भाजपाने बिरेन सिंग यांना मुख्यमंत्रीपदी नेमलं आणि पहिल्यांदाच भाजपाचा मुख्यमंत्री मणिपूर या पुर्वोत्तरच्या राज्यात झाला. यामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश नंतर मणिपूर हे भाजपाचा मुख्यमंत्री बाणवणार पूर्वोत्तर मधलं तिसरं राज्य ठरलं होतं.