तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सिरकार यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. ममता बॅनर्जी सरकारने ज्या पद्धतीने प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला पाशवी बलात्कार आणि हत्या प्रकरण हाताळले त्याचा संताप येऊन सिरकार यांनी हे पाऊल उचलले. शिवाय, पक्षातील काही लोकांकडून होत असलेल्या भ्रष्टाचारालाही आपण कंटाळलो असल्याचे सांगत त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला.
मात्र ममता बॅनर्जी यांनी सिरकार यांना फोन करून या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली.
सिरकार यांनी इंडिया टुडेशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की, पश्चिम बंगालला भ्रष्टाचाराचा रोग जडला आहे. ममता सरकारने जर आपल्या कारभाराची पद्धत बदलली नाही तर तिथे जातीयवादी पक्ष राज्याचा ताबा घेतील. प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि नंतर झालेली हत्या यामुळे उसळलेला संताप आणि झालेले आंदोलन हे राजकीय नव्हते. मी त्या आंदोलकांसोबत होतो. तो उफाळलेला असंतोष होता. काही राजकीय पक्षांनी त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न नक्की केला पण ते राजकीय आंदोलन नव्हते.
हे ही वाचा:
‘सुरतेची लूट’ म्हणणाऱ्यांना इतिहास अभ्यासक सदानंद मोरेंची चपराक
मंत्री अमित शाह लालबागच्या दर्शनाला नेहमी येतात, संजय राऊत तुम्हाला थोडी…!
चार अधीक्षक,२ लेखा परीक्षकांसह ८ जण सीबीआयच्या तावडीत
दिव्यांग खेळाडूंनी केला भीमपराक्रम; पॅरालिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके !
ममता बॅनर्जींना त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, काही लोकांना पाठीशी घातले जात आहे. अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. पक्षही त्याकडे गांभीर्याने पाहात नाही.
कोलकाता पोलिसांमधील स्वयंसेवक संजय रॉय याने हा बलात्कार आणि हत्या केल्याच आरोप आहे. त्याला अटकक करण्यात आली असून त्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे.
हे प्रकरण नीट न हाताळल्याबद्दल ममता सरकारवर पक्षातूनही बरीच टीका झाली. राज्य सरकारप्रणित ज्या रुग्णालयात ही घटना घडली त्यावर टीका करणारे पक्षाचे नेते शंतनू सेन यांना पक्षातून काढण्यात आले. पक्षाचे ज्येष्ठ नेते सुखेंदू शेखर रे या प्रकरणातील पोलिस तपासावर संशय व्यक्त केला.