27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारणजम्मू काश्मीरच्या बारामुल्ला, हंडवारामध्ये ३३ वर्षांनी उघडली चित्रपटगृहे

जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला, हंडवारामध्ये ३३ वर्षांनी उघडली चित्रपटगृहे

दोन शहरांमधील १०० आसनक्षमतेच्या दोन चित्रपटगृहांचे अनावरण

Google News Follow

Related

तब्बल ३३ वर्षांनंतर, शनिवारी जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला आणि हंडवारा शहरांत चित्रपटगृहे उघडली. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी उत्तर काश्मीरमधील या दोन शहरांमधील १०० आसनक्षमतेच्या दोन चित्रपटगृहांचे अनावरण केले.  

ऑगस्ट २०१९मध्ये जम्मू आणि काश्मीरचा वेगळा दर्जा हटवल्यानंतर येथील दहशत संपून नागरिकांना मनोरंजनाचे पर्याय उपलब्ध व्हावेत आणि जनजीवन सुरळीत व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच दहशतवादामुळे बंद करावी लागलेली चित्रपटगृहे पुन्हा उघडावीत, चित्रपटसंस्कृतीला पुन्हा चालना मिळावी, यासाठी केंद्रातर्फे सुरू असलेल्या मोहिमेचा भाग म्हणून ही चित्रपटगृहे उघडण्यात आली आहेत.  

गेल्या वर्षी शोपियान आणि पुलवामा येथील चित्रपटगृहांचे उद्‌घाटन सिन्हा यांनी केले होते. श्रीनगरमध्येही मल्टिप्लेक्स उघडले आहे. जम्मू -काश्मीरमधील लोकांनी मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा अनुभव घेतला पाहिजे, यासाठी नायब राज्यपालांनी प्रत्येक जिल्ह्यात चित्रपटगृह उघडण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

अजित पवारांसह फुटीर आमदार अचानक शरद पवारांना भेटले

नशीब असावं तर असं! लॉटरी खरेदी केल्यावर तासाभरात क्लर्क झाला करोडपती

टोमॅटो विकून एका महिन्यात कमावले कोटी

पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यात रुपया ठरला खणखणीत…

जम्मू आणि काश्मीर हे एकेकाळी भारतीय चित्रपटसृष्टीचा स्वर्ग मानला जात असे. येथे अनेक लोकप्रिय चित्रपटांची चित्रिकरणे पार पडली आहेत. बारामुल्ला आणि हंडवारा येथील चित्रपटगृहांचे उद्‌घाटन करताना सिन्हा यांनी या अविस्मरणीय क्षणाबद्दल जम्मू-काश्मीरवासींचे अभिनंदन केले. तसेच, ही चित्रपटगृहे म्हणजे जम्मू आणि काश्मीरच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेचे द्योतक आहे, असे प्रतिपादन केले.  

ही दोन्ही चित्रपटगृहे सार्वजनिक-खासगी भागिदारी तत्त्वावर उभारण्यात आली आहेत. या चित्रपटगृहात एक कॅफे, कॉन्फरन्स आणि तरुणांसाठी सेमिनारची सुविधाही देण्यात आली आहे. या चित्रपटगृहात लवकरच ‘पठाण’ चित्रपट दाखवला जाणार आहे. सन १९९०मध्ये बारामुल्ला येथे रिगिना आणि लष्करातर्फे चालवले जाणारे थिमिया चित्रपटगृहे होती. मात्र सीमेपलीकडून घुसखोरी वाढल्यानंतर या चित्रपटगृहांचे अतोनात नुकसान झाले.  

नायब राज्यपालांनी यावेळी बारामुल्लातील काही विकासप्रकल्पांचेही उद्‌घाटन केले. ‘महत्त्वाकांक्षी जिल्हा असणारा बारामुल्ला प्रेरणादायी जिल्हा म्हणून वाटचाल करत आहे. विकासाच्या दिशेने त्याची पावले पडत आहेत,’ असे सिन्हा यावेळी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा