धर्मांतरानंतर दहशतवादी बनलेल्या मुलीसाठी आईचे केंद्राकडे साकडे

धर्मांतरानंतर दहशतवादी बनलेल्या मुलीसाठी आईचे केंद्राकडे साकडे

एकीकडे उत्तर प्रदेशातील धर्मांतराची पाळेमुळे भारतात विविध राज्यांत पसरलेली दिसत असताना केरळमधील एका प्रकरणाने या धर्मांतराच्या मुद्द्यातील वेगळा पैलू दिसला आहे. हे प्रकरण चार-पाच वर्षांपूर्वीचे असले तरी बिंदू संपत अफगाणिस्तानमध्ये तुरुंगात डांबलेल्या आणि इस्लामिक स्टेटची दहशतवादी असलेल्या आपल्या मुलीच्या सुटकेसाठी केंद्राकडे आर्जव करत आहेत. केरळमध्ये राहणाऱ्या बिंदू संपत यांच्या मुलीचे निमिषा संपतचे असेच धर्मांतर करण्यात आले आणि नंतर ही मुलगी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (आयएस) मध्ये रुजू झाली. तिचा दहशतवादी पती मारला गेल्यानंतर आज ती अफगाणिस्तानच्या तुरुंगात खितपत पडली आहे. भारतात असलेल्या तिच्या आईने केरळ उच्च न्यायालयात दाद मागून तिला आणि तिच्या मुलीला भारतात आणण्याची मागणी केली आहे.

या मुलीच्या धर्मांतराची आणि तिच्या आजच्या अवस्थेची कहाणी दारुण आहे. २०१५मध्ये ती कॉलेजमधूनच पळून गेली. त्यानंतर या हिंदू मुलीचे मुस्लिम धर्मात धर्मांतर करण्यात आले. त्याच वर्षी तिने बक्सिन तथा इसा या मुलाशी लग्न केले. २०१६मध्ये हे दोघेही व्यवसाय करण्याच्या उद्देशाने श्रीलंकेत गेले. पण नंतर २१ जण अफगाणिस्तानला इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी गेल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. त्यात निमिषा आणि तिच्या पतीचा समावेश असल्याचे कळले. त्या दरम्यान तिला मुलगीही झाली. तिचा पती बक्सिन तथा इसा इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता. तीदेखील त्या संघटनेत रुजू झाली. मात्र तिचा नवरा अमेरिकेच्या लष्कराकडून मारला गेल्यावर निमिषा तथा फातिमाला तिथल्या तुरुंगात टाकण्यात आले. बिंदू यांनी आपल्या मुलीच्या धर्मांतराची तक्रार केली होती, पण तिचा ठावठिकाणा त्यांना कळू शकला नाही. आता ती अफगाणिस्तानच्या तुरुंगात खितपत पडली असल्याचे बिंदू यांना कळले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तिला भारतात आणावे, अशी मागणी बिंदू यांच्याकडून केली जात आहे. मुलीचा आणि आपल्या नातीच्या मूलभूत अधिकारांचा विचार करा, अशी मागणी बिंदू यांनी केली आहे.

हे ही वाचा:

लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांना लोकल प्रवासाला परवानगी?

ठाकरे सरकार वारकऱ्यांची मुस्कटदाबी करतंय

पुष्कर सिंह धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

भाजपापाठोपाठ रासपही ओबीसी आरक्षणासाठी आक्रमक

२०१६मध्ये केरळ राज्यातील १९ लोक गायब झाल्याचे तेथील सरकारच्या लक्षात आले होते. त्यांनी यासंदर्भात आयबी, एनआयए, रॉ अशा राष्ट्रीय संघटनांकडे विचारणा केली. या १९ पैकी १० पुरुष, ६ महिला आणि तीन मुले होती. हिंदू आणि ख्रिश्चन धर्मातून त्यांना धर्मांतरित करण्यात आले होते. यातील सहा महिलांचे पती आयएसचे सदस्य होते आणि त्यांचा चकमकीत मृत्यू झाला होता.

बिंदू यांचे म्हणणे आहे की, ती ज्या कॉलेजमध्ये शिकत होती, तिथेच तिचे धर्मांतर करण्यात आले. तिच्या कॉलेजातील मैत्रिणीनेच तिच्या धर्मांतरात महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यांनी यात सहभाग घेतला ते आज इथे मजेत राहात आहेत.

निमिषा उर्फ फातिमा जेव्हा आपल्या नवऱ्यासोबत अफगाणिस्तानला पळून गेली तेव्हा ती सात महिन्यांची गरोदर होती. आता तिला मुलगीही आहे. पण आता ती अफगाणिस्तानच्या तुरुंगात खितपत पडली आहे. मुलीच्या या अवस्थेमुळे बिंदू संपत या हतबल झाल्या आहेत.

Exit mobile version