अग्निपथ योजनेंतर्गत हवाई दलाला सात लाखाहून अधिक अर्ज

अग्निपथ योजनेंतर्गत हवाई दलाला सात लाखाहून अधिक अर्ज

केंद्र सरकारने युवकांसाठी ‘अग्निपथ’ योजना सुरु केली आहे. त्यांनतर लष्कर भरतीच्या या योजनेला देशभरात विरोध झाला होता. मात्र दुसरीकडे, या योजनेला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे.

अग्निपथ योजना मागे घेण्यात यावी अशी देशभरातून मागणी करण्यात येत होती. ही योजना मागे घेण्यासाठी देशात अनेक ठिकाणी हिंसक निदर्शनं, जाळपोळ झाली होती. अग्निपथ योजना मागे घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती. मात्र दुसरीकडे या योजनेसाठी अर्ज केलेल्यांचा आकडा थक्क करणारा आहे. फक्त वायूदलात अग्निपथ योजनेअंतर्गत आतापर्यंत ७ लाख ४९ हजार ८९९ अर्ज प्राप्त झाले आहेत. इंडियन एअर फोर्सच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

‘महाविकास आघाडीमुळे हिंदुत्वासाठी निर्णय घेऊ शकलो नाही’

“शिवसेना म्हणून मान्यता मिळेल, संख्याबळाच्या जोरावर धनुष्यबाण चिन्हंही मिळेल”

‘नवं सरकार सर्वसामान्यांचं आहे’

वीर सावरकरांचे विचार आम्हाला महाविकास आघाडीत असताना मांडता येत नव्हते!

अग्निपथ योजना १४ जून रोजी जाहीर करण्यात आली होती. ज्यामध्ये १७ ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांना केवळ चार वर्षांसाठी सैन्यात भरती करण्याची तरतूद आहे. यातील २५ टक्के तरुणांची सेवा चार वर्षांनंतर नियमित करण्याची तरतूद आहे. त्यांनतर सरकारने या भरतीसाठी उच्च वयोमर्यादा २३ वर्षे केली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत सशस्त्र दलात सामील झालेल्या सैनिकांना राज्य पोलिस दलात भरतीसाठी प्राधान्य दिले जाईल, असे अनेक राज्यांनी जाहीर केले आहे.
मात्र, नव्या भरती योजनेच्या विरोधात हिंसक निदर्शने आणि जाळपोळ करणाऱ्यांचा त्यात समावेश केला जाणार नसल्याचे सशस्त्र दलाने म्हटले आहे.

Exit mobile version