भाजपच्या स्थापनादिनी एक लाखांहून अधिक लोक पक्षात सामील होणार!

मध्यप्रदेश युनिट अध्यक्षांचा दावा

भाजपच्या स्थापनादिनी एक लाखांहून अधिक लोक पक्षात सामील होणार!

लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशात मोठा राजकीय बदल होण्याची शक्यता आहे.भाजपच्या स्थापना दिनी लाखो लोक भाजपमध्ये सामील होणार आहेत, असा दावा प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.मध्यप्रदेशातील २९ लोकसभा जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे.

भाजपचे मध्यप्रदेश युनिटचे अध्यक्ष विष्णुदत्त शर्मा यांनी गुरुवारी(४ एप्रिल) दावा करत म्हणाले की, ६ एप्रिल तारखेला स्थापना दिनानिमित्त एक लाखांहून अधिक लोक पक्षात प्रवेश करतील.भाजपकडून राहुल लोधी यांनी उमेदवारी साठी अर्ज दाखल केला.त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी चर्चा करताना भाष्य केलं.विष्णुदत्त शर्मा पुढे म्हणाले की, राज्यामध्ये काँग्रेस लाचार झाली आहे.माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग निवडणूक लढविण्याची इच्छा नसल्याचे सांगत असताना त्यांना जबरदस्तीने पाठवले जात आहे.

हे ही वाचा:

अर्थशास्त्रज्ञांना जमलं नाही ते चहा विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान झाल्यावर करून दाखवलं!

काँग्रेसचा ‘हात’ सोडणाऱ्या गौरव वल्लभ यांचा भाजपात प्रवेश

सिद्धू मुसेवालाचे वडील लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत!

मोईत्रा यांच्या विरोधात ईडीकडून मनी लाँडरिंगचा गुन्हा

ते पुढे म्हणाले, काँग्रेस खजुराहो लोकसभा मतदार संघातून पळून गेली आहे.संपूर्ण मध्यप्रदेशात काँग्रेसकडे नेतृत्व उरलेले नाही.जनतेने काँग्रेसला नाकारले आहे.प्रत्येक बुथवर लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.येत्या ६ तारखेला एक लाखांहून अधिक लोक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असे विष्णुदत्त शर्मा म्हणाले.

दरम्यान, मध्यप्रदेशातील २९ लोकसभा जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे.पहिला टप्पा १९ एप्रिल, दुसरा टप्पा २६ एप्रिल, तिसरा टप्पा ७ मी आणि चौथा टप्प्यासाठी १४ मे रोजी मतदान होणार आहे.सर्व टप्प्यांचे निकाल ४ जून रोजी पार पडणार आहे.

Exit mobile version