पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाच्या पहिल्या दिवशी सांगितले की, २०२१ मध्ये देशभरात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) मोडद्वारे जवळपास पन्नास लाखाहून अधिक कोटींचे व्यवहार झाले आहेत. देशाचा आर्थिक विकास दर ८ टक्के पेक्षा जास्त आहे आणि विक्रमी विदेशी गुंतवणूक भारतात आली आहे. त्यामुळे जीएसटी संकलनात जुने विक्रमही मोडीत निघाले आहेत, असे ते म्हणाले.
२०२१ मध्ये भारताने सुमारे ७० लाख कोटी व्यवहार यूपीआय द्वारे केले आहेत. आज भारतात ५० हजारांहून अधिक स्टार्ट- अप कार्यरत आहेत. यापैकी, गेल्या सहा महिन्यांत दहा हजारांहून अधिक स्टार्ट- अप निर्माण झाले आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले. आज आपण नवीन वर्षात पदार्पण करत असताना, गेल्या वर्षभराच्या आपल्या प्रयत्नांमधून प्रेरणा घेऊन आपल्याला नवीन संकल्पांकडे वाटचाल करायची आहे, असेही मोदी म्हणाले. या वर्षी आपण आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करणार आहोत. नव्या दमदार प्रवासाला सुरुवात करण्याची तसेच नव्या जोमाने पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
नवीन वर्ष महागाईचे की स्वस्ताईचे? वाचा सविस्तर
नोव्हेंबर महिन्यात भारताने केली तिसऱ्या बॅलेस्टिक मिसाईल सबमरीनची यशस्वी चाचणी
कंगना रानौतला न्यायालयाचा धक्का!
समीर वानखेडे यांचा एनसीबी कार्यकाळ संपला; कशी होती त्यांची कारकीर्द?
कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी सुमारे ३५१ शेतकरी उत्पादक संस्थांना १४ कोटींहून अधिक अनुदान जारी केले आहे. ज्याचा फायदा १ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच सध्या पीएम किसान योजनेंतर्गत, पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना प्रति वर्ष ६ हजार रुपये आर्थिक लाभ प्रदान केला जातो. ही निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. या योजनेत आतापर्यंत १ लाख ६० हजार कोटींहून अधिक रक्कम शेतकरी कुटुंबांना हस्तांतरित करण्यात आली आहे.