तुकाराम सुपेंच्या घरातून २ कोटी जप्त  

तुकाराम सुपेंच्या घरातून २ कोटी जप्त  

म्हाडा पेपर फुटी संदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यात तपास करत असताना टीईटी परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला असून महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली. सुपे आणि त्यांच्या मेव्हण्याच्या घरावर आज दुसऱ्यांदा पोलिसांनी धाड टाकली असून यावेळी कोट्यवधी रुपये पोलिसांना सापडले आहेत.

तुकाराम सुपे यांच्या घरावरील  दुसऱ्या धाडीत आणखी पैशाचे घबाड सापडले आहे. पोलिसांनी सुपेंच्या घरातून २ कोटीहून अधिक रक्कम आणि सोने हस्तगत केले आहे. तुकाराम सुपे यांच्या घरातून १७ डिसेंबरला पहिल्या धाडी दरम्यान ८८ लाख ४९ हजार ९८० रोख, पाच ग्राम सोन्याचे नाणे, ५ लाख ५० हजार रुपयांची एफडी केल्याची कागदपत्रे जप्त केली होती. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

तेलंगणामध्ये समलैंगिक पुरुष अडकले लग्नबंधनात!

नव्या घोटाळ्याची भरती; पोलीस परीक्षेत घोळ

देशात फोफावतोय ओमिक्रोन; राज्यात ५४ बाधित रुग्ण

शास्त्रज्ञाने घडवला रोहिणी न्यायालयात स्फोट 

म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात डॉ. प्रीतीश देशमुख यांच्या घरी केलेल्या छापेमारीत २०२०च्या टीईटी परीक्षेच्या सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते. या आधारे टीईटी परीक्षेसंदर्भात चौकशी करून तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर डॉ. देशमुख यांच्या घरातून पोलीस भरतीतील काही विद्यार्थ्यांची ओळखपत्रे सापडल्याने पोलीस भरती परीक्षेमध्येही घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version