25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणएमआयएमचे शंभरहून अधिक कार्यकर्ते देणार राजीनामे

एमआयएमचे शंभरहून अधिक कार्यकर्ते देणार राजीनामे

Google News Follow

Related

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना पक्षातील कार्यकर्त्यांनकडून मोठा धक्का बसणार आहे. प्रयागराजमध्ये एमआयएमचे अनेक कार्यकर्ते आज, १२ जुलै रोजी सामूहिक राजीनामे देणार आहेत. प्रयागराजमधील जिल्हा आणि शहर समितीशी संबंधित एआयएमआयएमचे सर्व कार्यकर्ते आज पक्ष सोडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ओवेसींच्या पक्षाचे शंभरहून अधिक कार्यकर्ते आज सामूहिक राजीनामे देणार असल्याचा दावा प्रयागराजच्या पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. १० जून रोजी प्रयागराजमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसाचारात राज्य नेतृत्वाने हस्तक्षेप न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे हे सर्वजण आज राजीनामा देणार आहेत. १० जून रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणी एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष शाह आलम आणि सरचिटणीस झीशान रहमानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले आहे. यामुळे शाह आलमचे समर्थक, अधिकारी आणि नेतेच राजीनामे देतील, असे सांगितले जात आहे. या प्रकरणी ज्या नेत्यांवर पक्षाकडून आरोप करण्यात आले आहेत, त्यांना कोणतीही मदत केली जात नसल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे.

हे ही वाचा:

खासदारांच्या दबावानंतर भाजपाच्या उमेदवार मुर्मू यांना शिवसेनेचा पाठींबा

सोनिया गांधी यांना ईडीचे समन्स; २१ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

लोक पेटवत आहेत सोन्याची लंका !

सोबतच्या पंधरा आमदारांना उद्धव ठाकरेंचं भावनिक पत्र

१० जून रोजी प्रयागराजमधील अटाळा परिसरात शुक्रवारच्या नमाजानंतर प्रचंड गोंधळ, जाळपोळ आणि दगडफेक झाली होती. त्यांनतर याप्रकणी एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष शाह आलम आणि सरचिटणीस झीशान रहमानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंसाचारात राज्य नेतृत्वाने हस्तक्षेप न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे हे सर्वजण आज दुपारी ४ वाजता सामूहिक राजीनामे देणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा