स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाच्या निर्णयामुळे अवघ्या ५२ दिवसांमध्ये १ कोटी ४ लाख ८६ हजार ज्येष्ठांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती समोर आली आहे. यानंतर ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकांचे आशिर्वाद राज्य शासनाला मिळाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात २६ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर २०२२ या महिन्याभराच्या कालावधीत ५४ लाख ५८ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला होता. तर १६ ऑक्टोबरपर्यंत या योजनेतंर्गत मोफत प्रवास केलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या १ कोटी ४ लाख ८६ हजार ८०९ एवढी झाली आहे.
राज्यभरातून योजनेद्वारे दिवसाला सरासरी २ लाख ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखवल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येतो. ही योजना जाहीर होताच या योजनेची थट्टा करण्यात आली होती तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कशाला हवी ही योजना असे म्हटले जात होते पण आता लाभार्थ्यांची संख्या सोर येताच या टीकेला उत्तर मिळाले आहे.
हे ही वाचा:
पीएफआयला राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधायची होती
पूजा चव्हाणसाठी मी लढत असताना भास्करशेठ तुम्ही कुठल्या बिळात लपला होतात?
रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवासाच्या योजनेची घोषणा केली होती. पुढे २५ ऑगस्ट २०२२ रोजी ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण करून योजनेचा शुभारंभ एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला होता.